विद्यापीठ करणार विचारांचा प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:31 AM2017-09-29T01:31:34+5:302017-09-29T01:31:45+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे.

University dissemination of ideas | विद्यापीठ करणार विचारांचा प्रसार

विद्यापीठ करणार विचारांचा प्रसार

Next
ठळक मुद्देदीक्षाभूमीवर होणार आंबेडकर गौरवग्रंथाचे वितरण : मागासवर्गीयांसाठीच्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट आॅफ इंडिया’ हा गौरवग्रंथ धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाºया बांधवांना उपलब्ध व्हावा, यासाठी विद्यापीठाने विशेष पुढाकार घेतला आहे.
शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता दीक्षाभूमी परिसरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरवग्रंथ वितरण समारंभ तसेच वितरण केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल विशेष अतिथी राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले भूषवतील. राष्ट्रबांधणी तसेच राष्ट्रउभारणीत डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर या गौरवग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे. इंग्रजी, मराठी व हिंदीतील एकूण ४७ लेखांचा यात समावेश आहे.
तर मागासवर्गीयांच्या उपयोगासाठी प्रकाशित केलेल्या विद्यापीठ मार्गदर्शिकेचे लोकार्पण व वितरण केंद्राचे उद्घाटन शनिवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कृषी महाविद्यालय वसतिगृहाजवळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असलेल्या सोईसुविधा, केंद्र व राज्य शासनाचे निर्णय, आरक्षण धोरण, विविध योजना यांची माहिती या पुस्तिकेत आहे.
विद्यापीठ गेल्या १५ वर्षांपासून नियमितपणे अशा पद्धतीने माहिती पुस्तिका काढत आहे. या माहिती पुस्तिकेचे नि:शुल्क वितरण करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिवांनी दिली.

Web Title: University dissemination of ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.