किनवट तालुक्यात ९६ गावांना गारपिटीचा जबर फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:20 AM2018-02-17T00:20:28+5:302018-02-17T00:21:08+5:30
तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवाºयासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवा-यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला. गारपीटग्रस्त गावांची नावे अशी-दहेली, धावजीनाईक तांडा, निराळा, निराळा तांडा, दुंड्रा, सारखणी, जुनोनी (बे), खंबाळा, बोथ, परसरामना तांडा, हातोळा (बे), पार्डी (सी), सक्रूनाईक तांडा, उमरी (बा), टिटवी, चिंचखेड, गौरी, धानोरा (सी), रामपूर, पाथरी, चापलाना तांडा, टेंभी तांडा, मांडवी, नागापूर, सिरपूर, कोठारी (सी), डोंगरगाव, जरुर, कनकी, मिनकी, पिंपळगा (भि), पळशी, पाटोदा (बु), भिलगाव, जवरला, रायपूर तांडा, दगडवझरा (बे), उनकदेव, पिंपळशेंडा, लिंगी, रामजीना तांडा, वझरा (बु), गोकुंदा, मारेगाव (खा), घोटी, कमठाला, खेर्डा, मलकापूर, गणेशपूर, लोणी, बोधडी (बु), कारला, बोधडी (खु), चिखली (बु), चिखली (खु), हुडी (बे), बुधवारपेठ, बेंदी, आमडी, दाभाडी, दरसांगवी (चि), प्रधानसांगवी (चि), बेंदी तांडा, आंदबोरी (चि), दहेगाव, मलकवाडी, पोतरेड्डी, पाडी (खु), पार्डी (बे), येंदा, पेंदा, कोठारी (चि), शनिवारपेठ, भुलजा, मदनापूर, सिंगारवाडी, पिंपरफोडी, सुंगागुडा, पाटोदा (खु), सिंदगी, इंजेगाव, देवला तांडा, सालाईगुडा, कोसमेट, कोल्हारी, भिसी, हुडी, मुळझरा, परोटी, वाळकी (बु), रोडानाईक तांडा, परोटी तांडा, बुरकुलवाडी, इरेगाव, पांगरी या ९६ गावांचा समावेश आहे.
गहू (एकूण क्षेत्र- १६१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१११५ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी ६९ टक्के), रबी ज्वारी (एकूण क्षेत्र- ९६४ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-६६० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६८ टक्के), मका (एकूण क्षेत्र- ३३१ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२०७ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६२ टक्के), हरभरा (एकूण क्षेत्र-३०८६ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१६३४ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५२ टक्के), टरबूज (एकूण क्षेत्र-२५ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२६ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-९६ टक्के), केळी (एकूण क्षेत्र-१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-१०० टक्के), भाजीपाला (एकूण क्षेत्र-२०८ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१२२ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५८ टक्के).
पंचनाम्याचा अहवाल दोन दिवसांत द्या
कंधार : तालुक्यात अनेक गावांत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अन् फळपिकांचे मोठे नुकसान झाले़ अशा नुकसान झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे ग्रामस्तरीय समितीने करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. पत्रानुसार अ,ब,क,ड अशा प्रपत्रात अहवाल द्यायचा आहे. त्यात ३३ ते ५० टक्के, ५० टक्क्यांपेक्षा जास्त अशा भागात अहवाल द्यायचा असून, तो दोन दिवसांत देण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
गारपीटग्रस्त भागाची पाहणी
फुलवळ/माळाकोळी : फुलवळ, माळाकोळी परिसरातील गारपीटग्रस्त गावांना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेटी देवून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रबोधन मुळे, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, कृषी अधिकारी गायकवाड, विश्वांभर मंगनाळे, मंडळ अधिकारी शिवदास पटणे, कृषी पर्यवेक्षक किर्तीवाड, तलाठी कविता इंगळे, कृषी सहाय्यक कल्पना जाधव, प्रा. किशनराव डफडे, बालाजी तोटवाड, सरपंच रमेश मोरे, विश्वांभर बसवंते, ग्रामसेवक प्रकाश जाधव, गोविंद मोरे, सुधाकर मोरे उपस्थित होते. पानशेवडी येथील शेतकरी रमेश संभाजी मोरे, नामदेव माधव मोरे, कौशाबाई पांडुरंग मोरे, व्यंकट प्रभाकर मोरे, तुकाराम मोरे, पद्मिनबाई बाबाराव मोरे यांच्यासह ६५ ते ७० शेतकºयांचे नुकसान झाले.माळाकोळी परिसरातील माळेगाव, डोंगरगाव, चोंडी, मजरेसांगवी, घोटका, आष्टूर, रिसनगाव, लव्हराळ, रामतीर्थ, नगारवाडी आदी गावांना आ. चिखलीकरांनी भेटी दिल्या. यावेळी जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, पं.स.सदस्य बालाजी राठोड, पं. स.सदस्य जनार्धन तिडके, माळेगावचे सरपंच गोविंदराव राठोड, आंबादास जहागीरदार, परमेश्वर मुरकुटे, माजी सरपंच केरबा धुळगुंडे उपस्थित होते.