Maharashtra Election 2019 : नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के मतदान; सर्वात कमी मतदान नांदेड उत्तर मतदार संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 10:33 PM2019-10-21T22:33:09+5:302019-10-21T22:35:05+5:30
९ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले़
नांदेड : जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत ६५ टक्के मतदान झाले़ सर्वाधिक ७२. ५३ टक्के मतदान नायगाव विधानसभा मतदारसंघात झाले असून सर्वात कमी ५९.९३ टक्के मतदान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात झाले आहे.
किनवटमध्ये ६९़९५ टक्के, हदगाव ६७़९६, भोकर ६७़३९, नांदेड दक्षिण ६१़६०, लोहा ६४़७१, देगलूर ६०़९० तर मुखेड विधानसभा मतदारसंघात ६४़७९ टक्के मतदानाची नोंद झाली़ विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही नांदेड जिल्ह्यात ६५ टक्के इतकेच मतदान झाले होते़ यंदा मात्र किनवट आणि भोकर या मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला आहे़ २०१४ च्या निवडणुकीत भोकर मतदारसंघात ७१ टक्के मतदान झाले होते़ यावेळी ते ६७़३९ एवढे झाले आहे़ तर किनवटमध्ये २०१४ साली ७२ टक्के मतदानाची नोंद झाली होती़ यावेळी तेथे ६९़९५ टक्के मतदान झाले आहे़