पोलीस मुख्यालयात बदली केल्यामुळे कर्मचा-याचे शोले स्टाईल आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 01:56 PM2017-11-25T13:56:32+5:302017-11-25T13:59:29+5:30

सतत गैरहजर राहत असल्यामुळे पोलीस मुख्यालयात बदली केलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयासमोरच एका रुग्णालयाच्या छतावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.

Shole-style movement of the employee due to transfer to the police headquarters | पोलीस मुख्यालयात बदली केल्यामुळे कर्मचा-याचे शोले स्टाईल आंदोलन

पोलीस मुख्यालयात बदली केल्यामुळे कर्मचा-याचे शोले स्टाईल आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देसंजय मल्हारी जोंधळे असे कर्मचा-याचे नाव असून सतत गैरहजर राहत असल्यामुळे काही दिवसापूर्वीच त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती. इमारतीवर गळ्यात दोरी बांधून जोंधळे  आत्महत्या करण्याची धमकी देत होते.

नांदेड : सतत गैरहजर राहत असल्यामुळे पोलीस मुख्यालयात बदली केलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयासमोरच एका रुग्णालयाच्या छतावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले. जवळपास तासभराणानंतर त्या कर्मचा-याला खाली उतरवण्यास यश मिळाले.

संजय मल्हारी जोंधळे असे कर्मचा-याचे नाव असून सतत गैरहजर राहत असल्यामुळे काही दिवसापूर्वीच त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती. त्यामुळे ते नाराज होते. त्यातच ते वरिष्ठ अधिका-यांशी फटकून वागत. गेल्या काही दिवसापासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य हि ठीक नवहते. मुख्यालयासमोरच डॉ हंसराज वैद्य यांच्या रुग्णालयात ते उपचार घेत होते. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रुग्णालयातून ते थेट छतावर गेले.

या ठिकाणी गळ्यात दोरी बांधून जोंधळे  आत्महत्या करण्याची धमकी देत होते. हि बाब काही पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर डॉ वैद्य हे जोंधळे याना बोलण्यासाठी वर गेले. तर दुसरीकडे साध्या वेशात काही कर्मचारीही पोहचले. डॉ वैद्य यांच्याशी बोलण्यात गुंग असताना इतर कर्मचार्यांनी झडप घालून जोंधलेला पकडले. त्यामुळे पोलिसांसह उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर जोंधळे याना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले

Web Title: Shole-style movement of the employee due to transfer to the police headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड