...त्यामुळे मोदी आता थापा मारणार नाहीत; रामदास आठवलेंचा हळूच चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 03:57 PM2019-05-11T15:57:06+5:302019-05-11T15:59:20+5:30

सत्तेवर येताच ते आश्वासनांची पूर्तता करतील

... so Modi will not make false promises; Ramadas athawale's dig on modi | ...त्यामुळे मोदी आता थापा मारणार नाहीत; रामदास आठवलेंचा हळूच चिमटा

...त्यामुळे मोदी आता थापा मारणार नाहीत; रामदास आठवलेंचा हळूच चिमटा

Next

नांदेड : पंतप्रधान मोदी  यांनी सत्तेवर येताना जी आश्वासने दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी त्यांना लागणार आहे़ त्यामुळे पुन्हा सत्तेवर येताच ते आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत असे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका प्रश्नांवर बोलताना म्हटले. ते नांदेड येथे दुष्काळी परिस्थीचा आढावा घेण्यासाठी आले आहेत. 

शनिवारी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण असल्याचे सांगताना राज्य सरकार उपाययोजना करीत असल्याचे सांगितले़ यासाठी केंद्राकडूनही मदत केली जात आहे़ त्याचवेळी दुष्काळ निवारणासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे़ नव्या उद्योगांची उभारणी करावी तसेच शेतीला जोडधंदाही आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ 

तसेच राज्याला दुष्काळ निवारणासाठी दोन हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने दिल्याचे टिष्ट्वट मुख्यमंत्र्यांनी केले होते, प्रत्यक्षात ही मदत मिळालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत मुख्यमंत्रीही मोदींच्या पावलावर पाऊल टाकत आहेत काय असे विचारले असता त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर येताना जी आश्वासने दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे़ त्यामुळे पुन्हा सत्तेवर येताच ते आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत असे म्हटले. यासोबतच राजकीय वाटचालीबाबत बोलताना आठवले यांनी मी ज्यांना पाठींबा देतो त्यांचीच सत्ता येते़ माझा पाठींबा आता भाजपाला असून देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़

Web Title: ... so Modi will not make false promises; Ramadas athawale's dig on modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.