काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:53 PM2019-01-17T13:53:30+5:302019-01-17T13:59:43+5:30

अधिकृत प्रस्ताव आला नसल्याने वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याच्या तयारीत

There is no official proposal from Congress: Prakash Ambedkar | काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : प्रकाश आंबेडकर

काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : प्रकाश आंबेडकर

Next

नांदेड : वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आतापर्यंत आला नाही़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असली तरीही अधिकृत प्रस्ताव अद्याप आला नाही़ त्याचवेळी अजूनही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले़

नांदेडमध्ये गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन महासभेसाठी अ‍ॅड़आंबेडकर हे नांदेडमध्ये आले होते़ त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसकडून आघाडीबाबत अद्याप अधिकृत प्रस्ताव आला नसल्याने वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याच्या तयारीत आहे़ यामध्ये एमआयएमही सोबत असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी एमआयएमला बाजूला करण्याची अट घातली जात असल्याबाबत विचारले असता काँग्रेस अनेक ठिकाणी भाजपासोबत सत्तेत विराजमान असल्याचे सांगितले़ याबाबत त्यांनी उदगीर नगरपालिकेचे उदाहरण दिले़ काँग्रेसने भाजपाला सर्वप्रथम सोडावे, नंतर आमच्यावर टीका करावी, असे ते म्हणाले़ बहुजन वंचित आघाडीचा आरएसएसला असलेला हा विरोध सैद्धांतिक असल्याचे ते म्हणाले़ आरएसएस व्यक्तिगत, धर्मस्वातंत्र, लोकशाहीला नकार देते तर मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार करते़ यामुळे आमचा त्यांच्या विचाराशी लढा आहे़ 

प्रकाश आंबेडकर लोकसभेवर गेले पाहिजे अशी काँग्रेसची इच्छा असल्याच्या वक्तव्याबाबत विचारले असता काँग्रेसने २००४ पासून सातत्याने आपल्या विरोधात उमेदवार दिले असल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे काँग्रेसचे हे प्रेम दुटप्पी आहे़ असाच दुटप्पीपणा आ़जोगेंद्र कवाडे हेही दाखवित असल्याचे ते म्हणाले.

एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनीही यासंदर्भात मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल केल्यासंदर्भात माहिती देताना मराठ्यांना विविध समित्यांच्या शिफारशीवरील आरक्षण दिले गेले़ पण मुस्लिमांच्या आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अनेक समित्यांचे अहवाल सरकारने स्वीकारलेच नाहीत़ काँग्रेस आघाडीच्या काळातही मुस्लिम आरक्षण संदर्भात अनेक समित्यांचे अहवाल प्राप्त झाले होते़ मात्र ते बाजूला टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फेरोज लाला, प्रा.यशपाल भिंगे, श्याम कांबळे, प्रशांत इंगोले आदींची उपस्थिती होती.

Web Title: There is no official proposal from Congress: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.