वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न गरजेचे : नंदुरबार ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:59 PM2018-02-01T12:59:11+5:302018-02-01T12:59:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वाचन संस्कृतीला वृध्दीगत करण्यासाठी सर्वाकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा सूर वाचकप्रेमींकडून तळोदा येथे उमटला़
नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघ व सरकार मान्य मुक्तव्दार वाचनालय नगरपालिका यांच्या वतीने जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथालय संघाचे कार्यकर्ते व सेवक यांचे 17 वे वार्षिक अधिवेशन बुधवारी सकाळी 11 वाजता तळोदा येथील बापुजी मंगल कार्यालयात झाल़े ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक प्रवीण पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल़े अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ पीतांबर सरोदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, निखील तुरखिया, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, हैदरभाई नुराणी, अॅड़ गोविंद पाटील, हेमलाल मगरे, अंबिका शेडये, रोहिदास पाडवी, जालींधर भोई, सुरेश पाडवी, प्रदीप शेडये, मितलकुमार टवाळे, ए़टी़ वाघ, रणजीत राजपूत आदी उपस्थित होत़े
ई-ग्रंथालयासाठी प्रयत्न.
तळोदा शहरातील ग्रंथालयांच्या विकासासाठी प्रयत्न तसेच ई-ग्रंथालय व अभ्यासिका सुरु करत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अजय परेदशी यांनी सांगितल़े
ग्रंथालये बंद होणार नाहीत
दरम्यान, आजच्या इंटरनेटच्या जगात ग्रंथ तसेच वाचनाकडे दुर्लक्ष झाले आह़े त्यामुळे शासनाने ई-ग्रंथालयाची संकल्पना आणली़ परंतु यामुळे ग्रंथ व ग्रंथालये बंद होणार नाहीत़ तर त्यांच्यात बदलत्या काळानुरुप परीवर्तन करण्याकडे शासनाचे प्रयत्न चालले आहेत व ते योग्य त्या प्रमाणात होतील असेही यावेळी मान्यवरांकडून सांगण्यात आल़े ग्रंथालय संचालक म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रंथालय संगणकीकृत केले जातील असेही ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी सांगितल़े सुदाम राजपूत, बीपीन पाटील, नरेंद्र पाटील, कालुसिंग नाईक, पृथ्वीराज पटेल, सुनील मराठे, भरत गवळे आदींनी परिश्रम घेतल़े