नंदुरबार येथे नर्मदेत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू, 40 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 03:37 PM2019-01-15T15:37:50+5:302019-01-15T18:22:07+5:30
धडगाव तालुक्यातील भूषा येथे नर्मदा नदीत बोट उलटून 40 जण जखमी झाले.
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील भूषा येथे नर्मदा नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदेच्या पात्रात अंघोळीसाठी बोटीने गेलेले भाविक बोटीत बसले असताना ही दुर्दैवी घटना घडली. भूषा येथे मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मंगळवारीही भाविकांची गर्दी झाली होती. यादरम्यान एका बोटीत 50 भाविक बसून नदीत फेरफटका मारत असताना वजनाने बोट उलटून 40 जण जखमी झाले. ही माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू झाल्यानंतर भाविकांना वाचवण्यात आले. 40 जण गंभीरपणे जखमी झाल्याने त्यांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत होत़. दुपारी गंभीर रुग्णांना नंदुरबार आणि धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येत होते.
Maharashtra: Six people died after a boat capsized in Narmada river in Nandurbar district today. More details awaited. pic.twitter.com/wfv5PzVFVf
— ANI (@ANI) January 15, 2019