गुरांची अवैध वाहतूक करणा:यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:20 PM2017-09-03T12:20:19+5:302017-09-03T12:20:37+5:30

24 तासात दुसरी कारवाई : मोलगी परिसरात टोळी कार्यरत असल्याचा संशय

 Illegal transport of cattle: arrested | गुरांची अवैध वाहतूक करणा:यास अटक

गुरांची अवैध वाहतूक करणा:यास अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोलगी : मोलगी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी अक्कलकुवा येथे जीपमधून आठ गायींना बांधून घेऊन जात असताना साकलीउमर गावाजवळील चौफुलीवर सापळा रचून पकडले. या वेळी सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
या घटनेला 24 तास उलटत नाही तोवर दुस:या जीपला सात गायींची अवैधरित्या वाहतूक करताना पकडले. त्यामुळे महाराष्ट्र-गुजरात व मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातील अवैध गुरे वाहतूक करून त्यांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणा:यांचे धाबे दणाणले आहेत.
शुक्रवारच्या घटनेत एमएच 11 - टी 7326 या गाडीला आठ गायींसह पकडले. या वेळी मागावून येणा:या दुसरी गाडी क्रमांक एमएच 04- ईबी 1850 च्या चालकाने पोलिसांना पाहून सर्व वाहनातील सर्व गुरे अंधाराचा फायदा घेत सोडून देत घटना स्थळावरून पळून गेला. दरम्यान मोलगी पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करूं फरार गाडीचा मागोवा काढण्यासाठी अथक परिश्रम घेवून खडा पहारा ठेवला.
या वेळी पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे, फौजदार दीपक बागुल, हवालदार मोतीलाल घमंडे, पो.काँ.संतोष राठोड, पो.काँ.संतोष तावडे, पो.काँ.कल्पेश कर्णकार, अमोल शिरसाठ, वाहनचालक राजकुमार जाधव यांच्या पथकास पुन्हा गुप्त माहिती मिळाली असता त्यांनी फारार गाडी पुन्हा नव्याने सात गायींची वाहतूक करताना उखली, बोरवाडी, भोरकुंड, साकलीउमर मार्गे अक्कलकुव्याकडे जात असताना आटय़ाबारी गावालगतच्या बसथांबा जवळ गाडी क्रमांक एमएच 04-ईबी 1850 हीला सकाळी साडे सात वाजता पोलिसांनी अडविले. या वेळी चालकाने गाडी थांबवून साथीदारांसह पळ काढला असता पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यानंतर काही वेळाने एक इसम गाडीजवळ आला असता त्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी त्याने त्याचे नाव ईश्वर भांगा पाडवी (20) रा.जुनवानी, ता.अक्कलकुवा असे सांगितले. तसेच मी गाडीचा मालक असून, माङयाकडून सलमान नामक इसमाने गाडी दोन हजार रुपय भाडय़ाने घेतली. याप्रसंगी त्याने सांगितले की, पिंपळखुंटा, रोहणीबारीपाडा येथून गुरे भरून अक्कलकुवा येथे नेणार आहे.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून संबंधित इसमास गाडी व जणावरांसह मोलगी पोलीस ठाण्यात आणून ताब्यात घेतले. या वेळी 34 हजार 500 रुपयांच्या सात गायी, एक लाख 50 हजार रुपये किमतीची जीप, असा एकूण एक लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयितास ताब्यात घेतले.
सलग दोन दिवसापासून अवैधरित्या गुरांची वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आहे. या वेळी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या गुरांना ग्रामस्थ व पोलिसांनी चारा, पाण्याची व्यवस्था करून देत त्यांची सेवा करीत आहेत

Web Title:  Illegal transport of cattle: arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.