खर्डी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने सहा गावातील शेतक:यांचे नुकसान
By admin | Published: July 4, 2017 01:33 PM2017-07-04T13:33:12+5:302017-07-04T13:33:12+5:30
जिल्हाधिका:यांसह लोकप्रतिनिधींनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.4 - तळोदा तालुक्यातील बोरद, त:हावद, गंगापूर पुर्नवसन, खेडले, मोड, खरवड आदी गावांमध्ये खर्डी नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आह़े परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आह़े याबाबत तळोदा तहसीलदार यांच्या पथकाने संबंधित गावांची पाहणी केली आह़े
गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात दमदार पाऊस सुरु आह़े त्यामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आह़े सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खर्डी नदीचे पाणी गंगापूर पुर्नवसन, त:हावद, खेड, मोड आदी भागांमध्ये शिरल़े यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े परिसरातील ग्रामस्थांच्या घरात पुराचे पाणी शिरले आह़े तसेच परिसरात असलेले शेळ्या, कोंबडय़ा आदी जनावरांसह, शेतातील ठिंबकच्या नळ्यादेखील वाहून गेल्या असल्याचे सांगण्यात आल़े यातून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आह़े दरम्यान, घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष घनश्याम मंगळे, प्रांताधिकारी अमोल कांबळे, तहसीलदार योगेश चंद्रे आदींनी भेट देऊन आवश्यक त्या सूचना केल्या आह़े