रांझणी/चिनोदा परिसर : ढगाळ हवामानामुळे पपईवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:18 IST2017-12-16T12:18:41+5:302017-12-16T12:18:46+5:30

Ranjani / Chinoda area: Due to cloudy weather papaya fungal disease | रांझणी/चिनोदा परिसर : ढगाळ हवामानामुळे पपईवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

रांझणी/चिनोदा परिसर : ढगाळ हवामानामुळे पपईवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे विविध पिके धोक्यात आली आहेत़ त्यातच मुख्यत्वे परिसरातील पपई पिकावर ‘डाउनी मिल्डय़ू’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पपई उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत़
‘डाउनी मिल्डय़ू’ या रोगाच्या प्रार्दुभावात पपई पिकाच्या पानांच्या वरच्या भागावर छोटे पिवळे, तेलकट ठिपके दिसून येत असून पानांच्या खालच्या बाजूला  पांढ:या पावडरच्या स्वरुपात वाढ होत आह़े याचा जास्त संसर्ग झाल्याने पाने तसेच कोवळी फळे गळून पडत आहेत़ प्रादुर्भाव झालेल्या पपई पिकावर शेतक:यांकडून तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े दरम्यान परिसरात अजूनही ढगाळ वातावरण तसेच सकाळी पुरेसा सूर्यप्रकाश राहत नसल्याने हे वातावरण ‘डाउनी मिल्डय़ू’  रोगासाठी अनुकूल  असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आह़े कोवळी फळे काही प्रमाणात गळून पडल्याने पपई उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े 
ढगाळ हवामानाचा परिणाम
‘डाउनी मिल्डय़ू’चा प्रादुर्भाव मुख्यत्वे ढगाळ हवामानात तसेच ओलाव्यामुळे होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े गेल्या काही दिवसांपासून या रांझणीसह, चिनोदा, रोझवा पूर्नवसन या परिसरात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे रब्बी पिकांवरही याचा मोठा परिणाम होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला अशा ठिकाणी रब्बी पिकांची स्थिती दैनिय आह़े त्यामुळे येथील शेतकरीही चिंतेत सापडला आह़े
 

Web Title: Ranjani / Chinoda area: Due to cloudy weather papaya fungal disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.