सातपुडय़ाला लागले आंबा हंगामाचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:00 PM2018-01-11T13:00:01+5:302018-01-11T13:00:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ात आंबा झाडांना मोहोर आल्याने सध्या ठिकठिकाणी ‘मोहोरलेल्या’ बागा नजरेस पडत आहेत़ आंबा हंगामाचा वेध लागलेल्या सातपुडय़ात यंदा तब्बल 568 हेक्टरवर पसरलेल्या विस्तीर्ण बागांमधून सातपुडय़ातील गावठी आंब्याचा गोडवा चाखता येणार आह़े
केळी आणि पपईनंतर जिल्ह्यात सर्वाधिक आंबा झाडे आहेत़ जिल्ह्यात एकूण 1 हजार 843 हेक्टर क्षेत्रावर आंबा बागा आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात 0़50, अक्कलकुवा 642, नवापूर 564, धडगाव 567 व तळोदा तालुक्यात 20 हेक्टर आंबा झाडे आहेत़ यातही सातपुडय़ातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात तयार केला जाणारा कै:यांचा ‘आमचूर’ देशभरातील बाजारपेठेत पोहोचला आह़े येथे चालाणा:या आमचूर उद्योगामुळे सातपुडय़ातील अनेक कुटंबांना वार्षिक रोजगार मिळतो़ आमचूर उत्पादनातून दुर्गम भागातील व्यापा:यांचा व्यापार वाढीस लागत आह़े विशेष म्हणजे सातपुडय़ाच्या दुर्गम भागात झाडांवर लगडणारा ‘गावठी’ आंबा राज्यभर प्रसिद्ध आह़े आदिवासी बांधवांकडूनच उत्पादित केल्या जाणा:या या आंबा उत्पादनाची सध्या धडगाव तालुक्यात जय्यत तयारी सुरू असून आंबा बागांमध्ये दोन फवारणी पूर्ण करण्यात येऊन तिस:या फवारणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आह़े
दुर्गम भागात गावठी आंब्यासोबतच इतर अनेक प्रजातींच्या आंब्यांचे उत्पादन यंदा येणार असल्याने त्यांच्या ब्रँडिगची गरज भासणार आह़े यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रकारे नंदुरबार जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील व्यापा:यांसोबत संपर्क करण्यात आला होता़ त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने येथील आंबा एप्रिलनंतर राज्यभर पोहोचणार आह़े यासोबत आमचूर व्यापा:यांसोबतही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आह़े गुजरातसह मध्यप्रदेशातील इंदौर आणि राजस्थानातील आमचूर व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येण्यास उत्सुक असतात़ आमचूर उत्पादनामुळे दुर्गम भागात लाखो रूपयांची उलाढाल होत़े नैसर्गिकरित्या वनक्षेत्रात आणि परसबागेत वाढणा:या गावठी आंब्यांना देशभरात पोहोचवण्यासाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आह़े
धडगाव तालुक्यात ठिकठिकाणी मोहोर आलेल्या आंबा झाडांची गणना करण्याचे कामही कृषी विभाग हाती घेणार आह़े