भावजयीवर लैंगिक अत्याचार करणा:या दिराला सात वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:30 AM2018-10-24T11:30:39+5:302018-10-24T11:30:46+5:30

नंदुरबार : भावजयीवर बलात्का:या चुलत दिरास नंदुरबार न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली आह़े दोन वेळा बलात्कार जीवे ठार मारण्याची ...

Sexual harassment of a brother-in-law: The seven-year jail term | भावजयीवर लैंगिक अत्याचार करणा:या दिराला सात वर्षाचा कारावास

भावजयीवर लैंगिक अत्याचार करणा:या दिराला सात वर्षाचा कारावास

Next

नंदुरबार : भावजयीवर बलात्का:या चुलत दिरास नंदुरबार न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली आह़े दोन वेळा बलात्कार जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पिडितेने पुढे येत पोलीसात तक्रार दाखल केली होती़ धडगाव तालुक्यातील शेलकुईचा मुरद्यापाडा येथे ही घटना जानेवारी आणि फेब्रुवारी 2017 मध्ये घडली होती़ 
शेलकुईचा मुरद्यापाडा येथील पिडिता जानेवारी 2017 मध्ये घरी एकटीच असताना राज्या ठोग्या वळवी याने घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला होता़ ही घटना पिडितेने पतीस सांगितल्यानंतर त्यांनी गावपंचांना कळवली होती़ यानुसार आरोपी राजा वळवी याला पंचांनी बोलावले असता, त्याने माफी मागितल्याने त्यास सोडून देण्यात आले होत़े यादरम्यान फेब्रुवारी महिन्यात पुन्हा पिडित महिला घरात एकटी असताना तू पंचांसमक्ष माझा अपमान केला, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत पुन्हा बलात्कार केला होता़ या घटनेची माहिती तिने पतीला दिल्यावर धडगाव पोलीस ठाण्यात राज्या वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आऱजी़खैरनार यांनी शहादा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होत़े अतिरिक्त सत्र न्यायाधीश क़ेएल़व्यास यांच्या न्यायालयात साक्षी-पुरावे तपासल्यानंतर आरोपी राजा वळवी याला सात वर्ष सश्रम कारावास आणि 3 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ सरकार पक्षातर्फे अॅड़ विनोद गोसावी यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम सोनार यांनी काम सांभाळल़े 
तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक आऱजी़खैरनार, सरकारी वकील अॅड़ गोसावी यांची पोलीस अधिक्षक संजय पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच जिल्हा सरकारी वकील सुशिल पंडीत यांनी कौतूक केले आह़े 
 

Web Title: Sexual harassment of a brother-in-law: The seven-year jail term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.