पासपोर्टच्या ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ होणार कमी, नंदुरबारातील पोलीस दल होतय ‘हायटेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:20 PM2017-12-27T13:20:34+5:302017-12-27T13:20:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ओळख पडताळणीसाठी लागणारा वेळ आता कमी होणार आह़े ओळख परेडसाठी वारंवार घर शोधणा:या कर्मचा:यांना थेट टॅब देण्यात आले असून त्यात ऑनलाईन पडताळणी करून चार दिवसात पुढील कारवाई होणार आह़े
जिल्हा पोलीस दलाकडून नागरी समस्या सोडवण्यावर भर देण्यात येत आह़े यात प्रामुख्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ओळख पडताळणीचा मुद्दा होता़ पासपोर्ट कार्यालयातून जिल्हास्तरावर आणि तेथून पोलीस ठाणे स्तरावर आदेश मिळाल्यानंतर ही संबधित अजर्दाराचा शोध घेत त्याची चौकशी करून शेरा देण्याची पद्धत होती़ साधारण एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ होणा:या या चौकशीमुळे गरजूंचे हाल होत होत़े यावर मार्ग काढत पोलीस दलाने पासपोर्ट अर्ज केल्या जाणा:या संकेतस्थळाशी जोडून असलेले टॅब पोलीसांच्या हाती दिले आहेत़ जिल्ह्यातून दरवर्षी दोन हजार 400 नागरिक पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज करतात़ या अर्जानंतर पोलीस दलाकडे अजर्दाराची पाश्र्वभूमी आणि ओळख पडताळणी करण्याचे आदेश देण्यात येतात़ या आदेशानंतर होणा:या कारवाईस वेळ लागत होता़ हा वेळ वाचवण्यासाठी 12 पोलीस ठाण्यांमधील 12 पोलीस कर्मचा:यांना सर्व सोयींनीयुक्त असलेला टॅब वितरीत करण्यात आला आह़े या टॅबमध्ये पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर अजर्दाराचा अर्ज येऊन ओळख आणि इतर शेरे देण्याची व्यवस्था आह़े संबधिताची समोरासमोर चौकशी होत असताना त्याचा फोटो काढून ती माहिती थेट मुख्य कार्यालयाकडे पाठवण्याची तरतूद करण्यात आली असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आल़े