नंदुरबारात वनपट्टे धारकांचा हळद लागवडीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:34 PM2018-06-03T12:34:07+5:302018-06-03T12:34:07+5:30
लोकसमन्वयचा पुढाकार : जिल्हाधिका:यांच्या हस्ते शुभारंभ, शेतक:यांमध्ये कुतूहल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वनपट्टे धारक व स.स.प्र. बधितांच्या शेतीत ठिबक आधारित हळद पीक लागवडीचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. साधारणत: 50 एकरवर ठिबकच्या आधारावर लागवड करण्यात आली.
अक्कलकुवा तालुक्यातील आमली या गावातील वनपट्टे धारक मिठय़ा नाईक व प्रकाश नाईक या शेतक:यांच्या शेतात जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या हस्ते सिंचन आधारित हळद पीक लागवडीचा शुभारंभ झाला. वनपट्टे धारकांना पीककर्ज उपलब्ध होणे व आधुनिक तंत्रज्ञानासाठी कर्ज व कृषी विभागाकडून अनुदान उपलब्ध होणे ही जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेने स्टेट बँक ऑफ इंडिया, जैन इरिगेशन व भवरलाल अँड कांताई जैन मल्टिपर्पज फौंडेशन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 50 शेतक:यांच्या शेतात हळद व 50 शेतक:यांच्या शेतात आंबा असे 100 शेतक:यांच्या शेतात ठिबक सिंचन आधारित हळद लागवड व आबा लागवडीचा पथदर्शी उपक्रम सुरू केला आहे. यासाठी पीक कर्ज अर्थसहाय्य रुपात स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी उपलबद्ध करून दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, प्रकाश नाईक यांनी लोकसमन्वयच्या साह्याने मागील वर्षी नरेगा मधून विहीर घेतली व ती पूर्ण करत ह्या वर्षी आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत ही बाब अतिशय भूषणावह आहे. जिल्ह्यातील सरदार सरोवर विस्थापित हातात हात घालून आधुनिक तंत्रज्ञान वापरत आपला विकास घडवत आहेत त्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीर उभे आहे. सर्व प्रकारची मदत करावयास कटीबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी बोलताना दिली.
एका बाजूला लोकसंघर्ष मोर्चाचा वनपट्टे अधिकाराचा लढा सुरूच आहे तर दुस:या बाजूला वनपट्टे मिळालेल्या दावेदारांच्या शेतात शासनाच्या योजना, पीककर्ज व आधुनिक शेतीसाठी अनुदान पोहचवणारा नंदुरबार पहिला जिल्हा ठरला आहे. त्याबाबत लोकसमन्वयचे संजय महाजन व सचिन धांडे, लोकसंघर्ष मोर्चाचे काथा वसावे यांनी शासनाचे आभार मानले.
यावेळी जैन इरिगेशनचे बाळकृष्ण ब:हाटे, गोविंद पाटील, अमित ढमढेरे, स्टेटबँकेचे वानखेडे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख, लोकसमन्वयचे निशांत मगरे, देविदास वसावे, दीपाली पाटील, देवमोगरा पुनर्वसनचे सरपंच नरपत पाडवी, आमलीचे सरपंच भगतसिंग नाईक व शेकडो शेतकरी उपस्थित होते.