नंदुरबारात ग्रंथालय कर्मचा-यांचे विविध मागण्यांसाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:06 PM2018-03-01T12:06:52+5:302018-03-01T12:06:52+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 1 : सार्वजनिक ग्रंथालय कर्मचा:यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जिल्हाधिका:यांना निवेदन देखील देण्यात आले.
जिल्हा ग्रंथाल संघ व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातील ग्रंथालय कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. दर चार वर्षानी ग्रंथालयांच्या अनुदानात दुपटीने वाढ अपेक्षीत असतांना फक्त आश्वासने दिली गेली, त्याचे पालन होत नाही.
सार्वजनिक वाचनालयांच्या प्रश्नासाठी चार वर्षापासून केवळ सकारात्मक असल्याचे शासनाने कोरडे आश्वासन दिले आहे. कर्मचा:यांसाठी वेतनश्रेणी व सेवाशर्थी या संबधीचे व्यंकप्पा पत्की समितीचा अहवाल मंजुर करून त्याची अंमलबजावणी करावी. नवीन ग्रंथालयांच्या मान्यता प्रक्रिया चालू करून गाव तेथे ग्रंथालय सुरू करावे. विद्यमान ग्रंथालयांच्या श्रेणीत वाढ करून अर्थात दर्जा बदल तात्काळ करावा.
परिक्षण अनुदान एप्रिल 2017 पासून तिप्पट करावे व ग्रंथालय कायद्यात काळानुरूप सुधारणा करावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
धरणे आंदोलनात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पीतांबर सरोदे, उपाध्यक्ष रमाकांत पाटील, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सुधीर साळुंखे, सुलभा महिरे ,नरेंद्र पाटील, सुदाम राजपूत, सदाशिव माळी,विनोद पाटील, भरत गवळे, परेश राजपूत, अंबालाल निकुंभे, मीनाक्षी मगरे, ज्योती पाटील, कृष्णा ठाकरे, सुधीर साळुंखे, संजय देसले, काझी पाटील, संतोष पावरा, दिलीप पावरा, काझी निहाल, राकेश पवार, राजेश पाटील ,रामकृष्ण पाटील, जितेंद्र पाटील ,राजू ठाकरे यांनी सहभाग घेतला.