अंत्योदय योजनेच्या धान्यात ६० किलो कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:56 PM2017-10-04T23:56:36+5:302017-10-04T23:56:42+5:30

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत योजनेचा लाभ घेणाºया व अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींची योजनेतील शिधापत्रिका रद्द करून त्यांना प्राधान्य कुटुंबासाठी असलेल्या शिधापत्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे

60 kg reduction in grain of Antyodaya scheme | अंत्योदय योजनेच्या धान्यात ६० किलो कपात

अंत्योदय योजनेच्या धान्यात ६० किलो कपात

Next

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत योजनेचा लाभ घेणाºया व अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींची योजनेतील शिधापत्रिका रद्द करून त्यांना प्राधान्य कुटुंबासाठी असलेल्या शिधापत्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न गटातील व्यक्तींना पांढरी शिधापत्रिका दिली जाते. लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी शिधापत्रिका देण्यात आली आहे. वार्षिक बारा ते २५ हजार रुपये उत्पन्न असलेल्यांना अंत्योदय वा पिवळी शिधापत्रिका देण्यात येते. अंत्योदय योजनेचे लाभार्थी होण्यासाठी ग्रामसभेचा ठराव व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या सर्व्हेत समावेश आवश्यक आहे. अशा योजनेच्या लाभार्थींना प्रतिमाणसी २१ किलो गहू व १४ किलो तांदूळ असे महिन्याकाठी ३५ किलो धान्य दोन व तीन रुपये किलो दराने रेशनमधून उपलब्ध होते. एका शिधापत्रिकेत दोन व्यक्ती असल्यास त्यांना महिन्याकाठी ७० किलो धान्य देण्याची तरतूद आहे. अन्नसुरक्षा कायद्यान्वये प्रतिमानसी महिन्याला पाच किलो धान्य देण्याची तरतूद आहे. शिधापत्रिकेवर कितीही व्यक्ती असतील तरी अधिकाधिक ३५ किलो धान्य देण्याची या कायद्यात तरतूद आहे.महिन्याकाठी जादा धान्य अंत्योदय योजनेतील एक किंवा दोन लाभार्थी असलेल्या व्यक्तींवर दरमहा कमीत कमी ३५ व जास्तीत जास्त ७० किलो धान्य दिले जात असल्याने शासनाच्या मते दोन व्यक्तींसाठी ७० किलो धान्य महिन्याकाठी जादा होत आहे. या योजनेतील व्यक्तींकडून धान्याचा वापर होऊ शकत नाही त्यामुळे ते रेशनमधून खरेदी करीत नसावेत. त्यामुळे या पत्रिका रद्द करून त्यांना अन्नसुरक्षा कायद्यान्वये शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना महिन्याकाठी पाच व जास्तीत जास्त दहा किलोच धान्य मिळणार आहे. यातून शासनाची बचत होणार आहे.जिल्ह्यात ३५ हजार कुटुंबाना फटका
अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींचे प्राधान्य कुटुंबात स्थलांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्णातील ३५ हजार ३६९ शिधापत्रिकाधारकांना फटका बसणार आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या एक व्यक्तीची संख्या १५६९० इतकी असून, दोन व्यक्तींची संख्या १९,६८९ इतकी आहे. आॅक्टोबर महिन्यापासून या सर्वांना दरमहा पाच किंवा दहा किलो धान्य रेशन दुकानातून स्वस्त दरात मिळणार आहे.

Web Title: 60 kg reduction in grain of Antyodaya scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.