८६ हजार विज कर्मचारी सोमवारी संपावर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:19 PM2019-01-03T18:19:17+5:302019-01-03T18:19:37+5:30
महावितरण कंपनीने कर्मचा-यांची पुनर्रचना करतांना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावा, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट अप लागू करत असतांना अगोदरचे एकुण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेट अप लागू करणे, व्यवस्थापनाने महावितरण कंपनीत राबविण्यात येत असलेले खाजगीकरण व
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : महानिर्मिती,महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे ८६ हजार अधिकारी,कर्मचारी व अभियंते यांचे नेतृत्व करणा-या सहा प्रमुख संघटनांच्या कृती समितीने ७ जानेवारीला एकदिवसीय संप पुकारला आहे. कामगार संघटनांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासन अयशस्वी झाल्याने, तसेच चार वषार्नंतर औरंगाबाद शहराचे खाजगीकरण करण्यासाठी अदानी ग्रुपकडून सर्व्हे सुरू असल्याची माहिती सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी दिली आहे.
महावितरण कंपनीने कर्मचा-यांची पुनर्रचना करतांना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावा, महापारेषण कंपनीतील स्टाफ सेट अप लागू करत असतांना अगोदरचे एकुण मंजूर पदे कमी न करता स्टाफ सेट अप लागू करणे, व्यवस्थापनाने महावितरण कंपनीत राबविण्यात येत असलेले खाजगीकरण व फ्रान्चायझीकरणाचे धोरण थांबवावे, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगाव विभागाचे फ्रान्चायझीवर खाजगी भांडवलदार कंपनीला देण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जलविद्युत निर्मिती संचाचे शासनाने अधीग्रहन न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकारात कार्यरत ठेवावे. महानिर्मिती कंपनीचे २१० मे.वॅ.चे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर तिनही कंपन्यातील कामगारांना पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे, बदली धोरणाच्या पुर्नविचार संघटनांसोबत चर्चा करून राबविण्यात यावा, कंपनीतील कंत्राटी व आऊट सोर्स कर्मचा-याना टप्या टप्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान काम समान वेतनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी.सध्या औरंगाबाद शहराची वीज वितरण व्यवस्था महावितरण कंपनीकडे असून लवकरच औरंगाबाद शहराचे खाजगीकरण होण्याचे चिन्ह दिसत असून अदानी ग्रुप कडून शहराचा सर्वे चालू आहे. जी.टी.एल.कंपनीप्रमाणे पुन्हा अदानी औरंगाबादमध्ये पाय रोवणार असे चिन्ह दिसत आहेत. या मुद्यांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीतील घटक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटना, महाराष्ट्र स्टेट ईले.वर्कर्स फेडरेशन, म.रा.वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन, सबॉडीर्नेट इंजिनिएर्स असोसिएशन, महाराष्टÑ राज्य विज कामगार काँगे्रस (इंटक) या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. तशी नोटीसही प्रशासनास पुर्वीच बजावण्यात आली आहे.