वेतन देण्यास टाळाटाळ निवेदन : राष्टÑवादी माथाडी कामगार युनियनचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:39 AM2018-05-05T00:39:56+5:302018-05-05T00:39:56+5:30
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एस. आर. मीटरिंग पंप आणि सिस्टीम्स या कंपनीतील पंधरा कामगारांची कंपनी व्यवस्थापनाकडून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एस. आर. मीटरिंग पंप आणि सिस्टीम्स या कंपनीतील पंधरा कामगारांची कंपनी व्यवस्थापनाकडून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. यासंदर्भात राष्टÑवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले . गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीतील पंधरा कामगारांना वेतन दिले नसून, त्यांना वेतन देतो असे सांगत प्रत्यक्षात मात्र बळजबरीने राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. राजीनामा दिल्यानंतरही कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांना वेतन दिले गेले नाही. कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या प्रसंगी गणेश पवार, कुणाल बगाडे, कैलास धात्रक, अक्षय विभुते, कुणाल तांबट, मयूर बागुल, विश्वनाथ कांबळे, राजू मिश्रा, विशाल सोनवणे, संदीप कांबळे, नाविद शेख, सुयोग तांबट, अनंत जाधव, कुणाल गवारे उपस्थित
होते.