आॅनलाइन शिक्षक बदली प्रकियेत गैरफायदा कोल्हापूर येथील शिक्षिकेवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:52 AM2018-06-12T01:52:48+5:302018-06-12T01:52:48+5:30
आॅनलाइन शिक्षक बदली प्रकियेत विशेष संवर्ग भाग-२ मधून पती-पत्नी एकत्रीकरण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : आॅनलाइन शिक्षक बदली प्रकियेत विशेष संवर्ग भाग-२ मधून पती-पत्नी एकत्रीकरण योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर येथील एक शिक्षिक ा या योजनेअंतर्गत चुकीची माहिती भरून अांतरजिल्हा बदलीने नाशिक येथे हजर होण्यासाठी आली होती. परंतु, शिक्षिकेने चुकीची माहिती भरून या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रशासनाच्या समोर आल्याने संबंधित शिक्षिकेला कोल्हापूरला परत पाठविण्यात आले असून, याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेस पत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि. ११) दिली. कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका प्रतिभा मोरे यांनी आंतरजिल्हा बदलीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विशेष संवर्ग भाग-२ मधून बदलीसाठी आॅनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार त्यांची बदली होऊन त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेकडे हजर करून घेणेसाठी अर्ज दिला होता. याबाबत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी तथा पडताळणी केली असता प्रतिभा मोरे यांनी आॅनलाइन अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पती कोल्हापूर येथे सेवेत असतानाही त्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण करणेसाठी अर्ज सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. आॅनलाइन अर्जात चुकीची माहिती सादर करून आंतरजिल्हा बदली केली असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी प्रतिभा मोरे यांना नाशिक जिल्हा परिषदेत रुजू करून न घेता कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे परत पाठविले असून, यासंबंधीचे पत्रही कोल्हापूर जिल्हा परिषदेला पाठविण्यात अल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे.