धरा आधुनिक शिक्षणाची कास, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये भरविली ‘डिजीटल शाळा’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 03:07 PM2017-12-20T15:07:24+5:302017-12-20T16:13:59+5:30

आधुनिक शिक्षणपध्दतीकडे शालेय विद्यार्थ्यांचाही कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे.

 Aditya Thakre of the youth army has organized a digital school in Nashik. | धरा आधुनिक शिक्षणाची कास, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये भरविली ‘डिजीटल शाळा’

धरा आधुनिक शिक्षणाची कास, युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये भरविली ‘डिजीटल शाळा’

Next
ठळक मुद्देरावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजीटल शाळा’ भरविली.मनपा शाळा क्रमांक १६मध्ये साकारलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरुम’चे शुभारंभई-लर्निंग शिक्षण प्रणाली, डिजीटल अभ्यासाचे फायदे समजावून दिले

नाशिक : आधुनिक शिक्षणपध्दतीकडे शालेय विद्यार्थ्यांचाही कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे, असे सांगत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजीटल शाळा’ भरविली.
निमित्त होते, पोलीस वसाहतीमधील मनपा शाळा क्रमांक १६मध्ये साकारलेल्या ‘व्हर्चुअल क्लासरुम’च्या शुभारंभाचे! ठाकरे यांनी शाळेला बुधवारी (दि.२०) भेट देऊन क्लासरूमचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी येथील क्लासरुमसोबत जोडलेल्या अन्य महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर महानगरप्रमुख नगरसेवक अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे आदि मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शाळेच्या प्रारंगणात जमलेल्या विद्यार्थ्यांसोबत ठाकरे यांनी हस्तांदोलन करत फोटोसेशन केले. येथील कर्मवीर दादासाहेच फोटो गॅलरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

रावसाहेब थोरात सभागृहात मविप्रच्या विविध शाळांसह अन्य खासगी शाळांचे विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी सभागृहात हजेरी लावून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ई-मेल, ई-लर्निंग, टॅब, सोशल मिडिया आदिबाबत माहिती सांगितली. त्यानंतर आधुनिक शिक्षणपध्दतीला अनुसरून शिवसेनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आधुनिक शिक्षणपध्दतीविषयी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.

ई-लर्निंग शिक्षण प्रणाली, डिजीटल अभ्यासाचे फायदे समजावून दिले. या संकेतस्थळामार्फत विद्यार्थी मोफत स्मार्ट आधुनिक शिक्षणपध्दती समजून घेऊ शकतात. मुंबईमध्ये केलेल्या प्रयोगानंतर नाशिकमध्येही या दृष्टीकोनातून प्रयोग करण्याचे युवासेनेने ठरविले आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले. या संकेतस्थळामार्फत आठवी ते दहावीच्या विद्याथ्यांना मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title:  Aditya Thakre of the youth army has organized a digital school in Nashik.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.