पुन्हा नागरी वस्तीलगत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:40 AM2017-09-11T00:40:14+5:302017-09-11T00:40:23+5:30

डावा कालवा सध्या बिबट्याचा ‘कॉरिडॉर’ बनला असून, नागरी वस्तीतून जाणाºया कालवा क्षेत्रात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्या कधीही नागरी वसाहतीत शिरकाव करू शकतो या भीतीने नागरिक प्रचंड तणावात आहेत. थेट गंगापूर धरणाच्या जंगलापासून तर हिरावाडीपर्यंत बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Again the urban spatial leopards | पुन्हा नागरी वस्तीलगत बिबट्या

पुन्हा नागरी वस्तीलगत बिबट्या

Next

नाशिक : डावा कालवा सध्या बिबट्याचा ‘कॉरिडॉर’ बनला असून, नागरी वस्तीतून जाणाºया कालवा क्षेत्रात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्या कधीही नागरी वसाहतीत शिरकाव करू शकतो या भीतीने नागरिक प्रचंड तणावात आहेत. थेट गंगापूर धरणाच्या जंगलापासून तर हिरावाडीपर्यंत बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
या ‘कॉरिडॉर’मध्ये तीन ते चार पिंजरे लावले गेले आहे; मात्र बिबट्या पिंजºयात अडकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे. बिबट्याने शनिवारी संध्याकाळी मेरीच्या संरक्षक भिंतीवर दिलेल्या दर्शनाने परिसरातील रहिवाशांची पाचावर धारण बसली आहे. डावा कालवा परिसर हा बहुतांश मळ्यांचा आहे. तसेच पावसामुळे गाजर व रान गवताचेही साम्राज्य पाटालगत वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लपण्यास जागा निर्माण झाली आहे. एकूणच हा नैसर्गिक अधिवास बिबट्यासाठी सुरक्षित ठरत असल्यामुळे या परिसरात बिबट्याचा संचार वाढतच आहे. बिबट्याचा या भागात वाढलेला वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याबरोबरच बिबट्यासाठीही धोक्याचाच आहे.

 

Web Title: Again the urban spatial leopards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.