'या अल्लाह भारत के दुश्मनो को नेस्तनाबूत फरमा', मशिदींमधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 04:46 PM2019-02-15T16:46:04+5:302019-02-15T16:46:22+5:30

"या अल्लाह हमारे मुल्क भारत की दुश्मनसे हिफाजत फरमा, दहशतगर्दी करनेवालो को नेस्तनाबूत फरमा..."

'Allah Almighty fights enemies of India', prohibition of terrorist attacks from mosques | 'या अल्लाह भारत के दुश्मनो को नेस्तनाबूत फरमा', मशिदींमधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

'या अल्लाह भारत के दुश्मनो को नेस्तनाबूत फरमा', मशिदींमधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

Next

नाशिक : "या अल्लाह हमारे मुल्क भारत की दुश्मनसे हिफाजत फरमा, दहशतगर्दी करनेवालो को नेस्तनाबूत फरमा..." अशी प्रार्थना 'जुमा'च्या विशेष नमाझपठण दरम्यान धर्मगुरूंनी शहरातील विविध मशिदींमध्ये केली. उपस्थित हजारो मुस्लीम बांधवांनी त्यांच्या प्रार्थनेला सामूहिक स्वरूपात 'आमीन' म्हणत प्रतिसाद दिला. जम्मू काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या  माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सुन्नी मरकजी सिरत समिती व मुस्लीम समाजाकडून खतीब ए शहर हिसामुद्दीन अशरफी यांनी विशेष पत्रक जारी करून मशिदींमधून निषेध नोंदविला.

नाशिकमधील सुमारे 55 ते 60 मशिदींमधून या पत्रकाचे मौलवींनी जाहीर वाचन केले. दरम्यान, दहशतवादी संघटना या कोणत्या जाती धर्माच्या नसून, माणुसकीला लागलेला कलंक आहे. कोणताही धर्म मानवतावादी विरोधी शिकवण देत नाही. इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी सदैव माणुसकीचा पुरस्कार केला आहे. ते संपूर्ण मानवजातीला शांती, सदाचार, करुणा, प्रेमाचा संदेश देऊन गेले आहे. आपल्या देशावर प्रेम व श्रद्धा हा इमानचा एक भाग असल्याचे पैगंबरानी सांगितले आहे, असे यावेळी धर्मगुरूंनी आपल्या प्रवचनातून सांगितले. आज बहुतांश मशिदींमधून मौलवींनी जुमाच्या विशेष प्रवचनातून इस्लाम अन् देशप्रेम या विषयावर प्रकाश टाकला. 

सामूहिक प्रार्थना करताना या भ्याड हल्ल्याचा मशिदींमधून निषेध नोंदविला गेला. तसेच बडी दर्गा मैदानावर, जुने नाशिक भागातील हेलबावडी मशिदीबाहेर मुस्लीम बांधवांनी हातात तिरंगा घेत भारताचा जयजयकार करत, पाकिस्तान व दहशतवाद मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.

Web Title: 'Allah Almighty fights enemies of India', prohibition of terrorist attacks from mosques

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.