कौतुकाची थाप : विविध क्षेत्रांत काम करणाºया ११ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव दाभाडी येथे प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:05 AM2018-02-28T00:05:44+5:302018-02-28T00:05:44+5:30

मालेगाव : येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाºया ११ नागरिकांना प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Appreciative Appreciation: Managing guest honor award ceremony at Gaurav Dabhdi at the hands of eleven citizens working in various fields. | कौतुकाची थाप : विविध क्षेत्रांत काम करणाºया ११ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव दाभाडी येथे प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम

कौतुकाची थाप : विविध क्षेत्रांत काम करणाºया ११ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव दाभाडी येथे प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम

Next

मालेगाव : येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात गावातील विविध क्षेत्रांत कार्य करणाºया ११ नागरिकांना प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चारुशीला निकम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, सतीश कलंत्री, अरुण देवरे, अ‍ॅड. एल. के. निकम, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, कमळाबाई मोरे, उपसरपंच संगीता निकम, ग्रामपंचायत सदस्य सुभाष नहिरे, रामलीला समिती अध्यक्ष नकुल निकम, डॉ. एस. के. पाटील, शेतकी संघाचे संचालक हेमराज भामरे, मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष हरी निकम, बापू सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कसमादे भागातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कृषी, आरोग्य, अर्थ, तंत्रज्ञान, धार्मिक, ग्रामविकास, युवा संघटन यांसह विविध क्षेत्रांतील ११ नागरिक व कर्मचाºयांचा प्रबंधभूमी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शौर्य कामगिरीसाठी निकिता सोनवणे, साहित्यिक- तुषार शिल्लक, पोलीस प्रशासन- भगीरथ सोनवणे, सामाजिक संस्था- किरण पाटील, ग्रामविकास अधिकारी- दिलीप निकम, युवा संघटन- प्रसाद खैरनार, विधायक कार्य- निखिल पवार, महिला संघटक- नीलिमा पाटील, सामाजिक कार्यकर्ते- अमोल निकम, युवा संघटन- अभिजित निकम तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्याबद्दल शिवनेरी मित्रमंडळ यांना गौरविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक पूनम राऊत यांच्या दामिनी पथकाला विशेष सन्मानित करण्यात आले. कार्यक्र मात शुभम निकम यांच्या ग्रुपतर्फे म्युझिकल शो सादर करण्यात आला. चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्र मासाठी तुषार सूर्यवंशी, ऋषिकेश गोसावी, जगदीश मानकर, मंगेश निकम, हर्षल निकम, दादाजी सुपारे, त्र्यंबक मानकर, विशाल कलंकार उपस्थित होते. प्रस्तावना विशाल गोसावी यांनी केली. सूत्रसंचालन नीलेश नहिरे यांनी केले. विवेक साळुंके यांनी आभार मानले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Appreciative Appreciation: Managing guest honor award ceremony at Gaurav Dabhdi at the hands of eleven citizens working in various fields.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.