नवजात बाळाचा मृतदेह थेट नाशिक महापालिकेच्या आरोग्यधिका-यांच्या टेबलावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 06:18 PM2017-12-19T18:18:22+5:302017-12-19T18:20:37+5:30
पंचवटीमधील आशा अशोक तांदळे यांना प्रसूतीसाठी जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सात वाजता दाखल क रुनदेखील डॉक्टरांनी उपचार मंगळवारी सकाळपासून सुरू केले.
नाशिक : पंचवटी कारंजावरील महापालिके च्या इंदिरा गांधी रुग्णालयात गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी सोमवारी सकाळी सात वाजता दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बाळाचा मृतदेह थेट मनपाच्या मुख्यालय राजीव गांधी भवनामध्ये आणत आरोग्यधिका-यांचे दालन गाठले. यावेळी डॉक्टरांचा हलगर्जीपणा बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे सांगत मृतदेह अधिका-यांच्यासमोर टेबलावर ठेवला.
पंचवटीमधील आशा अशोक तांदळे यांना प्रसूतीसाठी जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सात वाजता दाखल क रुनदेखील डॉक्टरांनी उपचार मंगळवारी सकाळपासून सुरू केले. झालेल्या दिरंगाईमुळे प्रसूतीपश्चात बाळ दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत बाळाचा मृतदेह घेऊन नातेवाईकांनी आरोग्यधिका-यांकडे जाब विचारला. दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बाळाचा मृतदेह आरोग्यधिकाºयांच्या टेबलावर ठेवत नातेवाईक वृध्द महिलेने हंबरडा फोडला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा दाखवत प्रसूतीनंतर खासगी रुग्णालयाचा सल्ला दिल्याचे महिलेने यावेळी संतप्त होत सांगितले.