बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 08:48 PM2017-12-13T20:48:24+5:302017-12-13T23:08:26+5:30

काही महिन्यांपुर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांग्लादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जीवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ‘बुरखा’ फाडला.

 Bangladeshi girl selling to Nani in Nasik; Twice a year; Nashik: A girl suffers to escape from Calcutta Police raid 'Burkha' | बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’

बांगलादेशी मुलीची नाशिकच्या कुंटणखाण्याच्या ‘नानी’कडे विक्री; पोलिसांचा फाडला ‘बुरखा’

Next
ठळक मुद्देसलमाला भारतात मावशीने आणले नानीकडे पोहचविल्यानंतर दोन दिवस पिडितेसोबत बलात्कार वेश्या व्यावसायाला ‘खाकी’चे उघड संरक्षण असल्याचा प्रकार सिन्नरमध्ये उघडकीस

नाशिक :वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला सुपूर्द केले. यानंतर पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला आणि काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात देहविक्रयासाठी विकले गेले.

कोलकातामधील एका ग्रामीण भागात देहव्यापार बळजबरीने करून घेतला जात असताना मुलीने जीव मुठीत धरून त्या नरकसमान बाजारातून बाहेर उडी घेत पलायन केले. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या या बांगलादेशी तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर जिवाची पर्वा न करता ‘नानी’च्या गुंडांसह कथित मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील पोलिसांच्या खब-यांपासून बचाव करीत व्यथा मांडली. यावेळी तिने सिन्नरमधील औद्योगिक वसाहत पोलिसांचा ‘बुरखा’ फाडला.

देहविक्रयसाठी प्रवृत्त करत बळजबरीने नरकात ढकलणा-या त्या पीडित मुलीला शोधून सुखरूपपणे बांगलादेशात पोहोचविण्याचा त्यावेळी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिसांनी केलेला दावा अखेर जीव मुठीत धरत त्या मुलीने नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांकडे घडलेली हकिगत सांगून फोल ठरविला. या प्रकारामुळे सिन्नर पोलीसही सेक्स रॅकेट प्रकरणात गुंतल्याचे समोर येत असून पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. वेश्या व्यावसायाला ‘खाकी’चे उघड संरक्षण असल्याचा प्रकार सांगलीनंतर नाशिकच्या सिन्नरमध्ये उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. या दोघांना पोलीस अधिक्षकांकडे सोपविले गेले आहे. कारण या दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे सलमाने सांगितले.

अवैधरीत्या जंगलाच्या मार्गातून ‘बॉर्डर क्रॉस’ करण्यास प्रवृत्त
अल्पवयीन  मुलीला बांग्लादेशामधून फसवून तिच्या मावशीने भारतात आणले; मात्र तेदेखील अवैधरित्या. मुलीने प्रसारमाध्यमांसमोर हा धक्कादायक खुलासा केला आहे. भारत-बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेल्या जंगलातून नदीच्या मार्गे सलमाला भारतात मावशीने आणले आणि नाशिकच्या एका दलालाला सोपविले. त्यानंतर त्या दलालाने त्या बालिकेला साधारण वर्षभरापूर्वी सिन्नरच्या ‘नानी’च्या दलालालाकडे सुपुर्द केले. 'नानी'कडे पोहचविल्यानंतर दोन दिवस पिडितेसोबत बलात्कार केल्यानंतर तिला मुंबईकडे एका महिलेला विकले गेले. तेथून कोलकाताला विकले गेले. कोलकाताला पोलिसांनी अटक केल्यानंतर तेथे महिला दलालाने ५० हजार रुपये देऊन सुटका करून घेत कोलकात्याच्या वेश्या बाजारात विकले.

Web Title:  Bangladeshi girl selling to Nani in Nasik; Twice a year; Nashik: A girl suffers to escape from Calcutta Police raid 'Burkha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.