ब्राह्मणगाव : महालपाटणे रोड चौफुलीच्या मोरीवर कठडा नसल्याने अपघात सटाणा-मालेगाव रस्त्यावर वाहनचालकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:11 AM2018-05-19T00:11:15+5:302018-05-19T00:11:15+5:30
ब्राह्मणगाव : येथील एकलव्यनगर जवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावरील कठडा व सटाणा-मालेगाव रस्त्याला जोडणाऱ्या महालपाटणे चौफुलीजवळील पाटावरील पुलावर कठडे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ब्राह्मणगाव : येथील एकलव्यनगर जवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावरील कठडा व सटाणा-मालेगाव रस्त्याला जोडणाऱ्या महालपाटणे चौफुलीजवळील पाटावरील पुलावर कठडे बसविण्याची मागणी माजी उपसरपंच अनिल खरे, सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, अविनाश जोशी तसेच वाहनधारकांसह ग्रामस्थांनी केली आहे. येथील बसस्थानकापासून काही अंतरावर महालपाटणे चौफुली आहे. याच रस्त्याने गावातून जाऊन एकलव्यनगरजवळ गिरणा डावा कालव्याच्या पुलावरून अजमेर सौंदाणे, सटाणा, कºहे, तीर्थक्षेत्र दोधेश्वर, नामपूर या गावांना जाता येते. ब्राह्मणगाव येथून परिसरातील ग्रामीण भागातील गावांना जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर तसेच अंतर कमी असल्याने परिसरातून येणारे वाहनधारक व शेतकरी या गावांना जाण्यासाठी येथील महालपाटणे रोड चौफुलीपासून ते गिरणा डावा कालव्याच्या पुलावरून जाणाºया रस्त्याचा वापर करीत असतात. महत्त्वाचे म्हणजे गावापासून चार किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र पहाडेश्वर महादेव मंदिर तसेच अजमेर सौंदाणे रस्त्यालगत साईबाबांची कुटिया आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात व इतर दिवशी भाविक महादेव व साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. तसेच बाहेरील दुचाकीस्वारांना परिसरातील गावांना जाण्यासाठी महालपाटणे चौफुली-जवळील मोरीवरील कठडा, तर एकलव्यनगरजवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावर नसलेला कठड्यामुळे वाहन चालविताना लक्षात येत नसल्याने त्या जागी अपघात होऊन वाहनधारक जखमी होत आहेत, तर काहींना होणाºया दुखापतीस सामोरे जावे लागत आहे.
महत्त्वाचे म्हणजे परिसरातील अनेक शेतकरी नामपूर बाजार समितीत, तर काही शेतकरी उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल ट्रॅक्टरच्या साह्याने या रस्त्याने घेऊन जात असतात. ट्रॅक्टरने शेतमाल घेऊन जात असताना या गिरणा डावा कालव्याच्या पुलावरील कठडा तर त्याच रस्त्याने सटाणा-मालेगाव रस्त्याला जोडणारा महालपाटणे रोड चौफुलीच्या मोरीवर कठडा नसल्याने शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. याविषयी संबंधित विभागाला एकलव्यनगरजवळील गिरणा डावा कालव्याच्या पुलावर कठडा, तर गावाच्या काही अंतरावर असलेल्या महालपाटणे रोड चौफुलीच्या मोरीवर कठडा बसविण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.