किल्ल्यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन ऐतिहासिक वारसा जपण्याचे आवाहन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:10 AM2017-12-18T01:10:07+5:302017-12-18T01:10:45+5:30
संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्गांना संरक्षण देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्गांना संरक्षण देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन गड-किल्यांना संरक्षण देण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दिवसेंदिवस दुरवस्था होत असून, हा ऐतिहासिक ठेवा असुरक्षित झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील विविध भागांत असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करून त्यांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ, योगेश कापसे, प्रसाद दांगट, बजरंग पवार, युवराज पवार, नामदेव बांडे, डॉ. अजय कापडणीस, डॉ. संदीप भानोसे, डॉ. भरत ब्राह्मणे, मनोहर देशमुख, महंत चक्रपाणी, हर्षल पवार आदींसह कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.