दानपेटी फोडून रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:02 AM2018-06-16T00:02:37+5:302018-06-16T00:02:37+5:30
औरंगाबाद महामार्गावरील शिलापूर येथील श्री मारुती मंदिराला लक्ष्य करून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड व चिल्लर चोरून नेली.
एकलहरे : औरंगाबाद महामार्गावरील शिलापूर येथील श्री मारुती मंदिराला लक्ष्य करून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड व चिल्लर चोरून नेली. शिलापूर गावात जुन्या श्री मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करून गावकऱ्यांनी नवीन मंदिर उभारले आहे. गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. मंदिरात नव्याने बसविण्यात आलेल्यादानपेटीच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील रोकड व चिल्लर चोरून नेली. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याने औरंगाबाद महामार्गावरून येणारे-जाणारे प्रवासी दर्शनासाठी मोठ्या संख्येने थांबतात. तसेच शिलापूर व आजूबाजूच्या गावातील भाविक नित्याने दर्शनासाठी येतात.शुक्रवारी पहाटे नेहमीप्रमाणे पुजारी मंदिर उघडण्यास आले असता मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा व दानपेटी फोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.