गाळणाच्या जंगलातून खैरच्या लाकडांचा साठा जप्त; दक्षता पथकाने पिंजले जंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:34 PM2017-10-11T15:34:27+5:302017-10-11T15:37:05+5:30
मालेगाव उप वन वनविभागातील या पंचक्रोशीमध्ये सर्वत्र जंगल पसरले असून जंगलामध्ये खैर, साग आदि प्रजातीची विपूल वृक्षसंपदा आहे. यामुळे येथे वन्यजीवांची जैवविविधताही आढळून येथे.
नाशिक : मालेगाव तालुक्यातील उपवनविभागाच्या गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात असलेल्या सुमारे ८० ते ९० हेक्टर जंगल नाशिक वनविभागाच्या विशेष दक्षता पथकाने पिंजून काढले. दरम्यान, जंगलातील एका झापमध्ये तोडलेल्या खैरचा काही प्रमाणात साठा पथकाला आढळून आला आहे. पथकाने हा साठा जप्त केला आहे.
मालेगाव उप वन वनविभागातील या पंचक्रोशीमध्ये सर्वत्र जंगल पसरले असून जंगलामध्ये खैर, साग आदि प्रजातीची विपूल वृक्षसंपदा आहे. यामुळे येथे वन्यजीवांची जैवविविधताही आढळून येथे.
गुजरात-महाराष्टÑाच्या सीमेवरील नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी जंगलात घुसखोरी करणाºया गुटखा व्यवसायाशी संबंधित खैर तस्कर टोळ्यांनी मोर्चा थेट मालेगावपर्यंत वळविल्याचे सिध्द झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खैरची झाडे असल्यामुळे खैर काही स्थानिक नागरिक व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना प्रलोभने दाखवून त्यांची मने वळवून तोडून लंपास केला जात आहे. सुमारे चारशेपेक्षा अधिक झाडे कापल्याचे समोर आले आहे. या जंगलाच्या संरक्षण व संवर्धनासाठी मालेगाव उप वनविभागाच्या वतीने युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज असताना मुळात ‘कुंपणच शेत खातं’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे खैर तस्करांचे जंगलात फावल्याची चर्चा पंचक्रोशीमधील गावकºयांकडून केली जात आहे.