पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्याला ठोकल्या बेड्या

By admin | Published: June 19, 2017 10:58 PM2017-06-19T22:58:48+5:302017-06-19T22:58:48+5:30

पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारा सराईत गुन्हेगार संभाजी विलास कवळे (२३) याने महिनाभरापूर्वी तालुका पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला होता.

Chains locked at the hands of the police | पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्याला ठोकल्या बेड्या

पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Next

नाशिक : निफाडजवळील लाखलगाव येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारा सराईत गुन्हेगार संभाजी विलास कवळे (२३) याने महिनाभरापूर्वी तालुका पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला होता. त्याच्या मुसक्या आवळण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे.
शहर गुन्हे शाखेने अटक केली होती; मात्र तालुका पोलीस ठाण्यातील मातोरी गावातील घरफोडीमध्येही कवळेचा सहभाग असल्याने त्याच्या तपासासाठी त्याला तालुका पोलीसांकडे सोपविण्यात आले होते. या दरम्यान त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत १५ मे रोजी पळ काढला होता. मातोरी गावात घरफोडीची कबुली कवळे याने दिली होती. तसेच दरोड्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने यामधील संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर मातोरी घरफोडीच्या तपासासाठी तालुका पोलिसांनी कवळे यास ताब्यात घेतले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली जयेश भाबड, योगेश शिंदे यांचे पथक पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी तयार केले. फरार कवळेचा सर्वत्र शोध घेत त्याच्या मागावर पथक रवाना करण्यात आले होते. तब्बल महिनाभर या पथकाने जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यामधील गावे पिंजून काढली. अखेर एका गुप्त बातमीदाराकडून पथकाला खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर पथकाने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्हा गाठला. या भागात मिळालेल्या माहितीवरून सर्व संशयास्पद ठिकाणी कवळेचा शोध स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने घेतला. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात असलेल्या मंगरूळ गावात पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. कवळे हा दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तब्बल महिनाभरानंतर कवळेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. हा सराईत दरोडेखोर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात जबरी लूट, घरफोडी, दरोडे यांसारखे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले

Web Title: Chains locked at the hands of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.