चापडगाव वनविभाग हद्द : चार दिवसांची कोठडी शिकारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:30 PM2018-01-06T23:30:41+5:302018-01-07T00:25:11+5:30

सिन्नर : तालुक्यातील चापडगाव वनविभागाच्या हद्दीत शिकार करण्यासाठी आलेल्या टोळीला वनविभाग व ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

Chapadgaon forest area: Four-day police custody gang gangs | चापडगाव वनविभाग हद्द : चार दिवसांची कोठडी शिकारी टोळी गजाआड

चापडगाव वनविभाग हद्द : चार दिवसांची कोठडी शिकारी टोळी गजाआड

Next
ठळक मुद्देकर्मचारी व ग्रामस्थ टोळीवर नजर ठेवूनपाठलाग करून पाच संशयितांना पकडले

सिन्नर : तालुक्यातील चापडगाव वनविभागाच्या हद्दीत शिकार करण्यासाठी आलेल्या टोळीला वनविभाग व ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. पकडण्यात आलेल्या पाच संशयितांना सिन्नर न्यायालयाने चार दिवसांची वनविभागाची कस्टडी दिली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली.
गेल्या महिन्यापासून वनविभागाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी टोळी येत असल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली होती. त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ या टोळीवर नजर ठेवून होते. शुक्रवारी रात्री चापडगाव हद्दीतील वनविभागाच्या कम्पार्टमेंट नंबर २६८ मध्ये बॅटºया चमकत असल्याने शिकारी आले असल्याचा संशय आले. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बोडके यांना देण्यात आली. नांदूरशिंगोटे विभागाचे वनपाल पी. के. सरोदे, के. आर. इरकर, वसंत आव्हाड यांच्यासह भोजापूरचे सरपंच कैलास सहाणे, डॉ. परदेशी, योगेश परदेशी यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाने पाठलाग करून पाच संशयितांना पकडले. त्यांच्याकडून जाळ्या व पिशव्या साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. सुभाष गांगड (२८), शरद गांगड (१९), दिनकर गांगड (४७), भारत गांगड (२१) सर्व रा. धुळवाड व संतोष उघडे (२१) या पाच संशयितांना वनविभागाने ताब्यात घेऊन सिन्नर न्यायालयात नेले. या पाच संशयित शिकाºयांना ९ जानेवारीपर्यंत वनविभागाची कोठडी सुनावली आहे.
मोर पकडणारी टोळी असण्याची शक्यता
चापडगाव-चास हद्दीतील वनविभागाच्या जंगलात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून या जंगलातून मोरांची शिकार होत असल्याची शंका व्यक्त केली जात होती. गेल्या महिन्यापासून वनविभाग या शिकाºयांच्या मागावर होते. त्यामुळे पकडण्यात आलेले संशयित शिकारी मोरांची शिकार करण्यासाठी आले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, अधिक माहिती तपासात पुढे येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी दिली.

Web Title: Chapadgaon forest area: Four-day police custody gang gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल