संघर्ष समितीच्या तोंडाला पुसली पाने, ठेकेदार आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:21 AM2017-10-06T00:21:18+5:302017-10-06T00:21:30+5:30
जिल्हा परिषदेच्या मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच नोंदणीकृत ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे धनादेश वटत नसल्याप्रकरणी गुरुवारी (दि.५) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेतली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच नोंदणीकृत ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे धनादेश वटत नसल्याप्रकरणी गुरुवारी (दि.५) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेतली. अन्य योजनेतून निधी देऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी दीपककुमार मीणा यांनी दिले. तसेच यासंदर्भात शुक्रवारी (दि.६) एक तातडीची बैठक जिल्हा बॅँक अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची घेणार असल्याचे सांगितले.
गुरुवारी जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेऊन ठेकेदारांचे अडकलेले ३५ कोटी रुपये कधी भेटणार, यासंदर्भात चर्चा केली. मागे आंदोलनाच्या वेळी पाच सप्टेंबरपर्यंत यातील निम्मी रक्कम देण्याचे आश्वासन लेखा विभाग व जिल्हा बॅँकेने दिले होते, असे या संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले. त्यावर दीपककुमार मीणा यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांना सांगितले की, तुम्ही प्रत्येक वेळी आपल्यालाच लक्ष का करतात, याबाबत पदाधिकाºयांना का भेटत नाहीत, दुसºया निधीतून पैसे दिले तर माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा बॅँक अध्यक्ष व कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांना शुक्रवारी भेटून निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी, मजूर संघाचे संचालक शशिकांत आव्हाड, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे निसर्गराज सोनवणे, अजित सकाळे, अनिल चौघुले, चंद्रशेखर डांगे, संजय कडनोर आदी उपस्थित होते.