महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम : अधिकारी-कर्मचाºयांचा सहभाग नंदिनी, वाघाडीला झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:46 AM2018-03-05T00:46:54+5:302018-03-05T00:46:54+5:30
सिडको/सातपूर : महापालिकेच्या वतीने रविवारी तिडके कॉलनी येथील मिलिंदनगर या भागातील नंदिनी नदीची स्वच्छता करीत मोठ्या प्रमाणात कचरा व प्लॅस्टिक जमा केल्याने नंदिनी चकाचक झाल्याचे चित्र दिसून आले.
सिडको/सातपूर : महापालिकेच्या वतीने रविवारी तिडके कॉलनी येथील मिलिंदनगर या भागातील नंदिनी नदीची स्वच्छता करीत मोठ्या प्रमाणात कचरा व प्लॅस्टिक जमा केल्याने नंदिनी चकाचक झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, पंचवटी परिसरातील वाघाडी, नाशिकरोड परिसरातील वालदेवी नदीपात्रातही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. महापालिकेच्या सिडको व सातपूर भागांतील कर्मचाºयांसमवेत पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांच्या पुढाकाराने रविवारी (दि.४) पुन्हा तिडके कॉलनीतील मिलिंदनगर भागातील नाल्यात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नदीच्या झालेल्या बकाल स्वरूपामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. महापालिकेने दखल घेत नंदिनीची स्वच्छता केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नंदिनी नदीची स्वच्छता करण्यात यावी यासाठी पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी मोहीम हाती घेतली आहे. सकाळी ८ वाजेपासून ही मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेत सभापती हेमलता पाटील मनपाचे स्वच्छता निरीक्षक डी. आर. पवार, सुरेश ब्राह्मणकर, बाळासाहेब खैरनार आदींसह मनपाचे सिडको व सातपूर भागातली अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या नंदिनी नदीच्या साफसफाई मोहिमेत ५८० कर्मचाºयांनी सुमारे साडेबारा टन कचरा संकलित करून नंदिनीचे रूपच पालटले आहे. यावेळी पात्रात कचरा टाकणाºया तिघा व्यापाºयांकडून साडेपाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दि. ४ रोजी सकाळी नंदिनी नदी पात्राची विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ५८० अधिकारी कर्मचाºयांचे पाच गट तयार करण्यात आले होते. या मोहिमेत सफाई कर्मचारी, भुयारी गटार योजनेचे कर्मचारी, उद्यान, विद्युत, बांधकाम, कर आदी विभागांचे आणि मुख्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.