गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:23 AM2017-11-17T00:23:48+5:302017-11-17T00:24:49+5:30

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावले सायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

Cold on the Goddess: Onion and wheat growers; | गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले;

गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले;

Next

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावले
सायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
मागील महिन्यात बेमोसमी पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षबागेला मणी कुज आणि डावणी या रोगांनी ग्रासले होते. अनेक बागा कुज आणि गळ झाल्यानंतरही उभ्या राहिल्या. काही ठिकाणी उताराची आणि उंचावरील जमीन असल्याने व कष्टकरी शेतकरी असल्याने महागड्या फवारण्या करून पीक वाचवले असले तरी आता पुन्हा थंडीचा जोर वाढू लागल्याने या संकटाचा सामना करावा लागणार आहे. तसेच गोदाकाठ भागात नदीलगत उसाचे क्षेत्र मोठे असल्याने ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत. बैलगाडी, चार भांडी, मोजकेच कपडे घेऊन थाटलेला संसारात उबदार कपडे कोठून असणार? त्यांनाही या थंडीचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या थंडीची सर्वांना जरी डोकेदुखी ठरत असली तरी गरम कपड्यांच्या दुकानातील वाढती गर्दी दुकानदारांना सुखद धक्का देणारी आहे. कानटोपी, स्वेटर, मफरल, हॅण्डग्लोज, पायमोजे खरेदीसाठी गरम कपड्यांची दुकाने गजबजू लागली आहेत. गुलाबी थंडीने मात्र रस्त्यालगत उघड्यावर संसार थाटणाºया गरीब कुटुंबाला मोठा सामना करावा लागत आहे. पाल ठोकून राहाणारे नागरिक वाढत्या थंडीमुळे त्रस्त झाले आहेत. अंगावर फाटके कपडे, अंथरून- पांघरूण म्हणून कमी असलेल्या कपड्यांमुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे.आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता
गहू, कांदा भाजीपाला पिकासाठी थंडी चांगली असली तरी या पिकांसाठी कमी भांडवल आणि त्या तुलनेत कमी उत्पादन मिळते मात्र द्राक्ष पिकासाठी प्रचंड भांडवल आण िउत्पादनही चांगले मिळत असल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणति अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात थंडी पडली तर द्राक्ष मान्यांना तडे जाण्याचा संभव असतो शिवाय भुरी सारखा प्रभावी रोग घडात शिरकावा करतो त्यामुळे पीक बाजारात विक्र ीसाठी
जाईलच याची शास्वती नसल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी शेतकर्यांना महागडे औषधें फवारणी करावी लागत आहे
खर्चात वाढ होत असल्याने
आर्थिक गणति कोलंडण्याची शक्यता आहे.

एक महिन्यापूर्वी बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती त्यात कुज ,डावणी, गळ यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले त्यात आठ दिवसापासून वाढलेल्या थंडीमुळे शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा सुलतानी संकट उभे राहिले आहे, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकर्यांना आटापिटा करावा लागत आहे शिवाय थंडीने द्राक्ष फुगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे
-दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे

गोदाकाठ भागात वाढत्या थंडीमुळे कांदा, ऊस, गहू पिकावर चांगला परिणाम होत असला तरी द्राक्ष पिकावर भुरीच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे भुरी रोगावरील औषधें खरेदी करण्यासाठी शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो पर्यायाने खर्च वाढत आहे
- सोपान खालकर, औषध विक्रते.

Web Title: Cold on the Goddess: Onion and wheat growers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.