हास्यरंगात निनादले भावगीतांचे सूर
By Admin | Published: May 10, 2014 10:07 PM2014-05-10T22:07:59+5:302014-05-10T23:53:47+5:30
इंदिरानगर वसंत व्याख्यानमाला
इंदिरानगर वसंत व्याख्यानमाला
नाशिक : आचार्य अत्रे, पु़ ल़ देशपांडे यांच्या शैलीतील अस्सल विनोद व जीवनातील विनोदी प्रसंग सांगून श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतानाच जुन्या आठवणीतील गाणी गात ज्येष्ठ गायक अनंत देशपांडे यांनी मैफ ल रंगवली़
इंदिरानगर येथे आयोजित वसंत व्याखानमालेत देशपांडे यांनी चौथे पुष्प गंुफ ले़ त्यांना कवयित्री मधुरा गोरे यांनी साथ दिली़ विनोद, कविता व गाणी अशी अनोखी मैफ ल यावेळी रंगली़ जीवनात कळत न कळत घडणारे प्रसंग असो की ओठावर येणारे कोणतेही गीत असो गायकाला ते आनंद देत असते़ तसाच आनंद प्रत्येक कलाकाराने श्रोत्यांना देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले़ जीवनातील विविध विनोदी प्रसंग, अत्रे, पु़ ल़ देशपांडे यांचे विविध किस्से सांगतानाच देशपांडे यांनी तोच चंद्रमा नभात, सखी मंद झाल्या तारका, अजून अंबरात अशी विविध गीते सादर केली़ कवयित्री गोरे यांनी प्रेम, निसर्ग, जीवन यांवर कविता सादर केल्या़ त्यांना चारूदत्त दीक्षित व दीपक दीक्षित यांनी साथ संगत केली़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र करंबळेकर यांनी केले़