कांद्याचे नियमित लिलाव सुरू ठेवा, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:48 PM2017-09-15T19:48:56+5:302017-09-15T19:49:59+5:30
नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
कांद्याचे आधीच भाव गडगडले असून, त्यात लिलाव नियमित सुरू नसल्यास शेतकºयांचे नुकसान होऊ शकते. त्यातही गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची नियमित हजेरी पाहता कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा धोका पत्करत नाही. त्यामुळे रोजच्या रोज बाजारात कांदा विक्रीस आणत आहे. आता कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे आणि त्याअनुषंगाने कांदा व्यापारी वर्गाने लिलाव न करण्याची घेतलेली भूमिका त्यांचा प्रश्न आहे. मात्र यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू नसल्यास कांदा उत्पादकांचे लिलावाअभावी नुकसान होऊ शकते. जिल्ह्यातील सर्व १४ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालकांनी व सभापतींनी कांद्याचे त्या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमित लिलाव सुरू राहतील, याच्या सूचना प्रशासनाला कराव्यात, अशी मागणीही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.