नगरसेवक संतप्त : पूर्व विभागातील पाणीप्रश्नावर चर्चा अतिक्रमणे हटविली जात नाहीत मग प्रभाग समित्या कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:51 AM2017-12-29T01:51:07+5:302017-12-29T01:52:19+5:30
इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.
इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्नही सदस्यांनी केला.
पूर्व प्रभाग सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रभाग ३० मधील वडाळागावातील १०० फुटी रस्त्याच्या रुंदीकरणास अडथळा ठरणाºया अनधिकृत झोपड्या काढल्या, परंतु अद्यापही दगड आणि माती-सीमेंटचा मलबा तसाच आहे, अशी तक्रार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. तसेच महापालिकेच्या आरक्षित जागेवर तातडीने संरक्षक भिंत बांधावी अन्यथा अतिक्रमण पुन्हा होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. वडाळागावातील जसे अतिक्रमण काढले तसेच राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या १०० फुटी रस्त्याच्या पदपथावर दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या व टपºया वाढल्या आहेत त्या तातडीने काढाव्या, अशी सूचना सतीश सोनवणे यांनी केली. शंभर फुटी रस्ता, राजीवनगर झोपडपट्टी केव्हा श्वास घेईल, असा प्रश्नही सोनवणे यांनी केला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केली तर लगेच कामे होतात; प्रभाग सभेत नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने सांगूनही कामे होत नाहीत, अशी तक्रार बडोदे यांनी केली. वडाळागावातील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी संथगतीने कामे सुरू आहेत, असे बडोदे म्हणाले. तसेच वडाळागावातील अतिक्रमण काढण्यापूर्वी तेथील नळजोडणीचे नियोजन न केल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. तसेच परिसरात काही ठिकाणी पाणीपुरवठाही बंद झाल्याची तक्रार सुप्रिया खोडे यांनी केली. तसेच गावातील शौचालयामधील घाण रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे खोडे यांनी सांगितले. सावरकर उद्यानाची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाल्याची तक्रार अजिंक्य साने यांनी केली. तसेच जॉगिंग ट्रॅक येथील धार्मिक स्थळ काढले परंतु अद्यापही तेथील मलबा उचलण्यात आलेला नाही. तसेच रस्त्यांचे कामही सुरू केलेले नाही, असे साने यांनी सांगितले. यावेळी सुमारे ३३ लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.