ओखीचा तडाखा : सुरगाणा तालुक्यात भाताचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:42 PM2017-12-06T14:42:57+5:302017-12-06T14:43:24+5:30
सुरगाणा-समुद्रकिनाºयालगतच्या शहरांना नुकसान पोहचून मुंबई व त्यानंतर गुजरातकडे सरकलेल्या ओखी वादळामुळे झालेल्या पावसाने तालुक्यात चांगलीच हजेरी लावून पिकांचे नुकसान केले. पळसन येथे कारल्याचे संपुर्ण वेल भुईसपाट होऊन शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.

तालुक्यात दोन दिवसापासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाच डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासूनच पावसाच्या सरी पडायला सुरु वात झाली होती. दुपारी अकरा वाजेपासूनच रिमझिम अशी संततधार सुरू झाली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झाली होती. सुरगाणा दिवसभरात तालुक्यात २६ मि.ली. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खळ्यात रचून ठेवलेल्या भाताची उडवी प्लास्टिकने झाकण्या करीता एकच धावपळ सुरू झाली होती. पळसन येथे मांडव कोसळून कारल्याचे संपुर्ण वेल जमीनदोस्त झाले. खळयातील मळणीकरिता रचून ठेवलेला भात, खुरसणी, उडीद, कुळीथ,वरई,तूर, नागली तसेच बोरगाव परिसरातील घाटमाथ्यावरील टमाटे, स्ट्रॉबेरी, देवलदरी, करंजुल, गांडोळमाळ या भागात कारलीच्या बागाचे मांडव वादळी वार्यामुळे जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे म्हणून पावसाच्या भरोसावर जेमतेम पिकलेली शेती अवकाळी पावसाने भिजवुन टाकली आहे.