सभापतींच्या कन्येलाच डेंग्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:28 PM2017-10-24T23:28:03+5:302017-10-25T00:13:31+5:30
सिडको प्रभागाचे सभापती व प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या मुलीलाच डेंग्यूची लागण झाल्याने प्रभागातील अनारोग्य आणि अस्वच्छतेच्या कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे,.
पाथर्डी फाटा : सिडको प्रभागाचे सभापती व प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या मुलीलाच डेंग्यूची लागण झाल्याने प्रभागातील अनारोग्य आणि अस्वच्छतेच्या कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे,. गेले अनेक महिने वासननगरमध्ये स्वच्छता कर्मचारी व धूर आणि औषध फवारणी कर्मचाºयांचे दर्शनच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशांतनगरमध्ये कधीतरी दिसणारे कर्मचारी नेमके कोणते औषध फवारतात, त्याचे प्रमाण किती व कधी फवारतात यांविषयी नागरिक तर सोडाच पर्यवेक्षण यंत्रणाही साशंक आहे. सध्या सर्वत्र सर्दी, खोकला, ताप, मलेरिया व डेंग्यूचे रु ग्ण आढळून येत आहेत. आता तर सिडको विभागाचे सभापती सुदाम डेमसे यांच्याच कन्येला डेंग्यूचे निदान झाल्याने सामान्य नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सभापती डेमसे यांच्या म्हणण्यानुसार धूर व औषध फवारणीचा केवळ फार्स केला जात असून, मनपाचे मुजोर कर्मचारी व ठेकेदार याकडे गांभीर्याने बघत नाहीत. स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ठेकेदार यांची ते आयुक्तांकडे तक्र ार करणार आहेत.