देवगावी जखमी दुर्मिळ घुबडाला जीवदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 03:38 PM2018-04-25T15:38:18+5:302018-04-25T15:38:18+5:30
देवगाव- जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला येथील योगेश नामदेव बोचरे यांनी त्वरीत पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घेतल्याने घुबडाचे प्राण वाचले.
देवगाव- जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला येथील योगेश नामदेव बोचरे यांनी त्वरीत पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घेतल्याने घुबडाचे प्राण वाचले. बहुतांशी आपण पक्षी प्राणी जखमी अवस्थेत पाहतो. पाहून न पाहिल्यासारखे करून पुढे चालतो, परंतु काही निसर्गप्रेमी पशु पक्षी प्रेमी पशुपक्षांची ही अवस्था पाहताच गर्भगळीत होतात. त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती जागृत होते ते त्वरीत दखल घेतात.यातीलच देवगाव येथील नेहमी निसर्गाच्या जडण घडणीत रंगून जाणारे योगश बोचरे आपल्या द्राक्ष भागात चक्कर मारत असताना कावळे कुठल्या तरी पक्षाला टोचा मारत असताना दिसले. त्यांनी कावळ्यापासून त्याची सुटका केली. हा जखमी पक्षी घुबड असल्याचे समजताच त्याने गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.एल.जाधव यांनी त्वरीत उपचार करून वनविभागाशी संपर्क साधला. वनरक्षक येण्यापर्यंत बोचरे यांनी त्या घुबडाची सेवा केली. वनविभागाच्या टीममधील उपचारक एन.के. सोनवणे यांनी उपचार केले. वनरक्षक व्ही.आर.टेकनर,वनसेवक डी.पी.आहेर यांनी या घुबडाबाबत माहिती देताना सांगितले की, हा पक्षी आपल्याकडे फार दुर्मिळ असून हे घुबड ब्रँनओल गवांणी जातीचे आहे व त्याचे वय दोन वर्षे आहे. बोचरे यांनी हे घुबड वनरक्षकांकडे स्वाधीन केले.घुबडाच्या अंगावरील जखमा भरल्यानंतर व तो उडू लागल्यानंतर त्याला पुन्हा वन विभागात सोडण्यात येईल असे वनरक्षक यांनी सांगितले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अशोक बोचरे,राजेंद्र खुळे राहुल बोचरे,मनोहर बोचरे, अक्षय बोचरे,सतोष बोचरे आदी उपस्थित होते.