अन्नदात्याला दया नको, न्याय द्या : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:11 AM2018-08-23T01:11:40+5:302018-08-23T01:12:08+5:30

स्वत:ची मेहनत करून कष्ट करून बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केली पाहिजे ती केली गेली नाही, त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढत गेले. शेतकºयांचे अर्थकारण बिघडले आहे. जोपर्यंत अर्थकारण सुधारत नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाही.

Do not have mercy on the donor, give justice: Raju Shetty | अन्नदात्याला दया नको, न्याय द्या : राजू शेट्टी

अन्नदात्याला दया नको, न्याय द्या : राजू शेट्टी

Next

दिंडोरी : स्वत:ची मेहनत करून कष्ट करून बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केली पाहिजे ती केली गेली नाही, त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढत गेले. शेतकºयांचे अर्थकारण बिघडले आहे. जोपर्यंत अर्थकारण सुधारत नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाही. ते सोडविले गेले पाहिजे. अन्नदात्याला दया नको, न्याय द्या असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.  तालुक्यातील मोहाडी येथे ६२ व्या श्री गोपाळकृष्ण व्याख्यानमालेचे उद्घाटन खासदार राजू शेट्टी, सह्याद्री अ‍ॅग्रो फार्मचे व्यवस्थापक विलास शिंदे, कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी, स्वाभिमानी पक्षाचे प्रवक्ते संदीप जगताप, गोपाळ कृष्ण ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, हंसराज वडघुले, नाना बच्छाव आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेट्टी बोलत होते.  शेट्टी पुढे म्हणाले, शहरे वाढत गेली, बाहेरून येणारे लोंढे वाढत गेले. त्यावेळी सर्वांनी त्यांची बाजू लावून धरली; मात्र त्याचवेळी स्थानिक लोकांना कोणीही मदत केली नाही. शेतीचे शोषण फार पूर्वीपासूनच सुरू आहे. शेतक-यांना लुटण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि शेतकरी देशोधडीला लागला. त्यामुळे शेतकºयांना कुणाच्या तरी दयेवर जगावे लागत आहे.
सरकारने शेतकºयांना सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. जगातल्या शेतकºयांनी मान खाली घालावी, अशी प्रगती देशातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी प्रवीण जाधव, रमेश नाठे, दत्ता कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास देशमुख यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले.
साधू-संतांना शेतकºयांच्या वेदना कळल्या; मात्र इतरांना कळल्या नाहीत. शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करताना घासाघीस करतात. मात्र इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मागेल तेवढी किंमत मोजता. सर्वच सरकारांनी शेतकºयांची जबाबदारी स्वीकारली; मात्र धोरणाकडे दुर्लक्ष केले. आयात-निर्यात धोरण निश्चित केले पाहिजे.
- राजू शेट्टी, खासदार

Web Title: Do not have mercy on the donor, give justice: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.