ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 09:39 AM2019-03-23T09:39:35+5:302019-03-23T09:51:06+5:30

जेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी (23 मार्च) पहाटे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.

Dr Yashwant Pathak passes away in nashik | ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देजेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी (23 मार्च) पहाटे निधन झाले. कीर्तनकार गौतमबुवा पाठक यांच्या संस्करामुळे ते कीर्तन करीत.संत ज्ञानेश्वर यांच्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता.

नाशिक - जेष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे थोर अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे शनिवारी (23 मार्च) पहाटे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. कीर्तनकार गौतमबुवा पाठक यांच्या संस्करामुळे ते कीर्तन करीत. संत ज्ञानेश्वर यांच्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मनमाड येथील महात्मा गांधी महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. तसेच पुणे विद्यापीठातही विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. संत साहित्यावर त्यांनी महाराष्ट्रभर रसास्वादी व्याख्यानं दिली. त्यांची अंत्ययात्रा  आज दुपारी गंगापूर रोड,निर्मला कॉन्वेन्ट जवळील त्यांच्या निवास स्थानापासून निघणार आहे.

डॉ. यशवंत पाठक यांच्या अनेक पुस्तकांना शासनाचे व मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. मनमाडसारख्या काहीशा आडगावी बरेच वर्षे वास्तव्य झाल्याने त्यांच्या अभ्यासू वक्तृत्वाचा,अध्यात्मिक प्रासादिक मांडणीची म्हणावी तशी दखल साहित्य क्षेत्रात घेतली गेली नाही. दूरदर्शनवर त्यांना सातत्याने निमंत्रित केले जायचे.

यशवंत पाठक यांची मौलिक ग्रंथसंपदा

आनंदाचे आवार

चंद्राचा एकांत

कीर्तन प्रयोग

पहाट सरी

चंदनाची पाखर

येणे बोधे आम्हा असो सर्व काळ

संचिताची गोजागिरी

ब्रम्हगिरीची सावली

नाचू कीर्तनाचे रंगी

मोह मैत्रीचा

अंगणातले आभाळ

आभाळाचं अनुष्ठान

मनाच्या श्लोकाचे "मर्म"

Web Title: Dr Yashwant Pathak passes away in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक