पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 10:17 PM2017-10-08T22:17:30+5:302017-10-08T22:17:41+5:30
ओझर : गेल्या चार दिवसांपासून परिसरात सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचा आॅक्टोबर हंगाम धोक्यात आला असून, बागायतदार शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ओझर : गेल्या चार दिवसांपासून परिसरात सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचा आॅक्टोबर हंगाम धोक्यात आला असून, बागायतदार शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दसºयानंतर द्राक्षबागेसाठी आॅक्टोबर छाटणीचे नियोजन असते. या छाटणीवरच बागाचे भवितव्य असते. गेल्या चार दिवसांपासून शहर, पसिरात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असल्याने वातावरणात अचानक बदल झाला आहे. यामुळे द्राक्ष घड जिरण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. घडांमध्ये पावसाच्या थेंबाचे पाणी साठून डावणीचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ज्यांनी सुरुवातीला छाटण्या केल्या त्या बागांमध्ये फुलारा फुटला आहे. आॅक्टोबर छाटणी द्राक्ष उत्पादनातील महत्त्वाची पायरी आहे. महत्त्वाचा टप्पा असणाºया या प्रक्रि येत पाऊस झाल्याने कुजीचे प्रमाण वाढण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. खत व कीटकनाशकांचे भाव वाढले आहेत. दिवसागणिक घटणाºया उत्पन्नामुळे त्रस्त असलेला बळीराजा चिंतित झाला आहे.
निसर्गाने तरी साथ द्यावी अशी अपेक्षा सामान्य शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामुळे द्राक्षाबरोबर अन्य पिकांचेही नुकसान होत आहे.मागील वर्षीच्या हंगामात अनेक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यंदा बागांसाठी पोषक वातावरण वाटत असताना छाटणीच्या दिवसांमध्ये पाऊस सुरू द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच हवामानातील बदलामुळे अधिक संकटे येण्याची भीती आहे. छाटणीवरच द्राक्षबागाचे भविष्य असते. मागील वर्षीची तूट भरून काढताना यावर्षी तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित.
- वसंत भडके, द्राक्ष उत्पादक शेतकरी