'ईद-ए-मिलाद'निमित्ताने नाशिकमधील मालेगावात भव्य मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 11:19 AM2017-12-02T11:19:17+5:302017-12-02T11:29:00+5:30
ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील इस्लामपुरा येथील मदरसा सुन्निया हन्फिया येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उत्साहात व पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मालेगाव (नाशिक) - ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील इस्लामपुरा येथील मदरसा सुन्निया हन्फिया येथून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उत्साहात व पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक नवीन बस स्थानक, हजार खोली, सलिम चाचा रस्ता, मुशावरत चौक, नयापुरा, आझाद नगर, अमनचौक, चंदनपुरी गेट, किल्ला, गुळ बाजार, किदवाई रस्त्यासह शहरातील विविध भागातून होत एटीटी हायस्कूलच्या प्रांगणावर मिरवणुकीचा समारोप झाला.
मिरवणुकीच्या स्वागतार्ह मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुशोभित स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या. लहान बालकांसह मुस्लीम नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते. सय्यद आमिनुल कादरी, डॉ. रईस रिजवी, सुफी गुलाम रसुल, यांच्यासह शहरातील प्रमुख मौलवींचा सहभाग होता. यावेळी मौलवींचे पोलीस व राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उप विभागीय पोलीस अधिकारी अजित हगवणे, गजानन राजमाने, शशिकांत शिंदे, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
वडाळा गाव परिसरातून कढण्यात आलेल्या मिरवणूक