अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु जयदर परिसरात २२ तास वीज गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:49 AM2018-02-05T00:49:06+5:302018-02-05T00:49:37+5:30
कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु आहे.
कळवण : तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरु असून, जयदर वीज उपकेंद्रात्ांर्गत असलेल्या गावामध्ये सलग २२ तास वीज गायब राहत असल्याने आदिवासी बांधवांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. दिवसातून फक्त २ तास वीजपुरवठा होत असल्याने शेतपिकाला पाणी देणे शक्य होत नाही. त्यामुळे पुनंद खोºयातील वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा अन्यथा सोमवारी (दि.५) जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुळेचे सरपंच चंद्रकांत गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जयदर व परिसरातील शेतकरी बांधवासह सरपंच चंद्रकांत गवळी, अर्जुन बागुल, पंडीत पवार, मन्साराम ठाकरे, देवराम महाजन, पंडीत गायकवाड, चंद्रकांत गवळी, रामा गायकवाड, लक्क्ष्मण गांगुर्डे, तुळशीराम चौधरी, उत्तम बागुल, सदू महाजन, काशिनाथ महाले यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यकार्यकारी अभियंता ॠषीकेश खैरनार यांची भेट घेऊन निवेदन दिले. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून कळवण तालुक्यात गहू, कांदा भाजीपाला ही पिके घेतली जातात. तालुक्यात कांदा लागवड मोठ्याप्रमाणात झाली असून काही भागात लागवड सुरु आहे.
कांदा पिकाला पाणी देण्यासाठी दिवसातून आठ तास विजेची गरज आहे. परंतु पुनंद खोºयातील जयदर वीज उपकेंद्रांतर्गत परिसरातील गावात वीजेचा लपंडाव सुरु आहे. २४ तासात फक्त दोनच तास अनिश्चित वेळेत वीज मिळत असल्याने शेती पिकाला पाणी दिले जात नाही. सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास जयदर वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला असून ठिय्या आंदोलन काळात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. शिष्टमंडळात गणपत खांडवी, भावराव चौधरी, गोविंदा पवार, शिवाजी बागुल, लक्ष्मण पवार काशिनाथ भोये, उत्तम भोये, मन्साराम गायकवाड, सीताराम गायकवाड, परशराम भोये, गुलाब गांगुर्डे, राजाराम महाजन, रामदास महाजन, सखाराम ठाकरे, मणिराम बागुल, शिवराम खांडवी, भागवत जगताप, रामदास बागुल, सखाराम देहमुख, राजाराम गवळी, लक्ष्मण गवळी, धनराज गांगुर्डे, यशवंत भोये, मन्साराम बर्डे, शिवाजी चौधरी, महादू गायकवाड, दिनकर भोये आदी शेतकरी उपस्थित होते.