यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला ‘पर्सनलाज गिफ्ट’ वर जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:23 PM2018-02-13T14:23:01+5:302018-02-13T14:27:06+5:30
पर्सनलाईज केलेली वस्तू समोरचा व्यक्ती आवडीने जपून ठेवत असून त्याचे मुल्यही वाढते
भाग्यश्री मुळे
नाशिक- आपल्या प्रिय व्यक्तीला दुकानातुन नुसतीच वस्तू विकत आणून देण्यापेक्षा ती पर्सनलाईज करुन देण्याचा ट्रेंड यंदाच्या व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाच्या उत्सवातला सर्वात हिट ट्रेंड असल्याचे समोर आले आहे. अशी पर्सनलाईज केलेली वस्तू समोरचा व्यक्ती आवडीने जपून ठेवत असून त्याचे मुल्यही वाढत असल्याचे बोलले जाते. गेल्या ५ वर्षात हा ट्रेंड हिट असून मैत्री दिन, मदर्स, फादर्स डे आदि महत्वपुर्ण दिवसांबरोबरच व्हॅलेंटाईन डे ला मोठ्या प्रमाणात गिफ्ट पर्सनलाईज करुन देण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या आपल्या प्रिय व्यक्तीला देण्यासाठी खास असे पर्सनलाईज गिफ्ट तयार करुन घेण्याची धावपळ अनेक दुकानांमध्ये, शोरुम मध्ये पहायला मिळत आहे. सोशल मिडीयामुळे, इंटरनेटच्या वेगामुळे आपल्या प्रियजनांचे फोटो सहजगत्या उपलब्ध होत असून अगदी शेवटच्या काही तासांमध्येही कुणी पर्सनलाईज गिफ्ट देण्याचा विचार केला तर त्या गोष्टी सहजसाध्य होत आहे. यात मग, पिलो कव्हर, फोटो फ्रेम, मोबाईल कव्हर, टिशर्ट आदि ५०० हून अधिक वस्तू पर्सनलाईज करुन दिल्या जात आहे. यासाठी १२५ रुपयांपासून १०००० रुपयांपर्यंत खर्च येत असून मुळ वस्तूपेक्षा किंचीतसा जास्तीचा खर्च करुन वस्तूमध्ये आपलेपणा आणता येत असल्याने तरुणाईला हा प्रकार मोठ्या प्रमाणात आवडू लागला आहे. यातही क्रिस्टल, ग्लास, कॉटन, पॉलीस्टर, रबर असे असंख्य उपपर्यायही मिळत असल्याने निवडीला वाव आहे. पर्सनलाईज गिफ्टस वर केवळ प्रियजनांचे फोटोच दरवेळी प्रिंट करुन घेतले जातात असे नाही तर आपल्या प्रियजनांची संबोधने (लाडाची नावे), दोन उशा किंवा उशी कव्हर असतील तर एकावर ‘गुड’, एकावर ‘नाईट’, ‘ही’, ‘शी’ अशी अक्षरे मराठी, इंग्रजीत, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पहायला मिळत आहे. किचेन, फोटो फ्रेम, मग, टिशर्ट, पिलो आदि वस्तू पर्सनलाईज करुन गिफ्ट देण्याचे प्रकार आपण आजवर पाहिले आहेत. मात्र आपल्या प्रियजनांचा फोटो मुखपृष्ठावर असलेली वही (नोटबुक), पत्याचा कॅट, लॉकेट, कॅलेंडर, डेली किचन मेनुकार्ड, टेडीबिअरसह असंख्य प्रकारच्या सॉफ्टटॉईज, अल्फाबेटिकली चॉकलेट, पर्स, हॅँडबॅग्ज, स्वेटर, बरमुडा, ज्वेलरी बॉक्स, अॅप्रन, क्रिस्टल हर्ट, गॅलरी रॅप, माऊस पॅड,कॅँल स्टॅँड, टिफीन,सॉक्स पेअर्स, ग्ला सेट, नेलकटर, बॉलपेन, बेडशीट, पांघरुण, फॅमिली ट्री, क्लचर, साबण, परफ्युम, कोल्डक्रिम, हॅँडक्रिम अशा असंख्य वस्तू ्रआपल्या प्रियजनांची आवड लक्षात घेऊन तयार करुन मिळत आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला कसली अॅलर्जी आहे वा काय आवडत नाही तो प्रकार टाळला जातो.