आरटीओची चार दिवस आॅनलाईन सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:04 PM2018-03-28T15:04:26+5:302018-03-28T15:04:26+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाकडून यापुर्वी वाहनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणारे आर.सी. बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात वाहनधारकांना देण्यात येत होते. त्यासाठी आरटीओ कार्यालय अतिरीक्त शुल्कची आकारणी करीत होते. परंतु स्मार्टकार्डचे काम करणाºया ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर दिड
नाशिक : प्रादेशिक परिवहन अर्थातच आरटीओ कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले स्मार्टकार्ड येत्या २ एप्रिल पासून पुन्हा देण्यास सुरूवात केली जाणार असल्याने आपल्या वाहनांबाबत नागरिकांनी दि.२८ ते ३१ या कालावधीत आरटीओच्या आॅनलाईन सेवेत कोणतेही कामकाज न करण्याचे तसेच आरटीओच्या सेवांबाबत कोणतेही शुल्क या काळात न भरण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून यापुर्वी वाहनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणारे आर.सी. बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात वाहनधारकांना देण्यात येत होते. त्यासाठी आरटीओ कार्यालय अतिरीक्त शुल्कची आकारणी करीत होते. परंतु स्मार्टकार्डचे काम करणा-या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर दिड ते दोन वर्षापासून आरटीओकडून आर.सी. बुक साध्या कागदावर दिले जात होते. स्मार्टकार्डमध्ये वाहनधारकाची व वाहनाची सारी अद्यावत माहिती नमूद केलेली असल्याने व ते हाताळणे, बाळगणे सोपे असल्यामुळे वाहनधारकांकडून स्मार्टकार्डचा आग्रह धरला जात होता. परंतु ते बंद करण्यात आले होते. आता पुन्हा येत्या २ एप्रिलपासून प्लास्टिक स्वरूपातील स्मार्टकार्ड नोंदणी प्रमाण पत्र जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन नोंदणी होणाºया वाहने, वाहनाचे हस्तांतरण, पत्ता बदल, धनकोची नोंद करणे, कमी करणे, नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत जारी करणे आदी कामे आरटीओच्या आॅनलाईन सेवेच्या माध्यमातून होत असल्याने मंगळवारपर्यंत ज्यांनी या सेवांसाठी अर्र्ज केले त्यांचे काम येत्या चार दिवसात पुर्ण करण्यात येणार आहे. परिणामी दि. २८ ते ३१ पर्यंत आरटीओची कोणतीही सेवा या काळात दिली जाणार नाही. त्यामुळे वाहनधारकांनी या काळात अर्ज करू नये तसेच आरटीओच्या सेवेबाबत आॅनलाईन शुल्कचा भरणाही न करण्याचे आवाहन केले आहे. २ एप्रिलपासून वाहनधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येणार असल्याने त्यासाठी २०० रूपये अतिरीक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी सांगितले.