गिरीश महाजन : आरोग्य विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात घोषणा कट प्रॅक्टीस विरोधात लवकरच कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:00 AM2017-11-16T01:00:24+5:302017-11-16T01:15:40+5:30
नाशिक : इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र पवित्र मानले जात असले, तरी या क्षेत्रालाही कट प्रॅक्टीसचा रोग लागला आहे. यात सर्वच वैद्यकीय व्यवसायाला दोष देता येणार नाही; परंतु यातील काही अपप्रवृत्तींमुळे कट प्रॅक्टीस वाढीस लागली असल्याचे मान्य करावेच लागेल. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता राज्य शासन पाऊल उचलत असून, येत्याअधिवे शनात कट प्रॅक्टीस विरोधात कायदा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रति-कुलपती गिरीश महाजन यांनी केली.
नाशिक : इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र पवित्र मानले जात असले, तरी या क्षेत्रालाही कट प्रॅक्टीसचा रोग लागला आहे. यात सर्वच वैद्यकीय व्यवसायाला दोष देता येणार नाही; परंतु यातील काही अपप्रवृत्तींमुळे कट प्रॅक्टीस वाढीस लागली असल्याचे मान्य करावेच लागेल. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता राज्य शासन पाऊल उचलत असून, येत्या अधिवेशनात कट प्रॅक्टीस विरोधात कायदा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रति-कुलपती गिरीश महाजन यांनी केली.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सतराव्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक डॉ. रंदीप गुलेरिया, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, आयुष विभागाचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कांतीलाल संचेती,
सुलतानने ९, तर मानसीने मिळविली ७ पदके
डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसचा विद्यार्थी सुलतान मोईनोद्दीन शौकतअली याने उत्कृष्ट विद्यार्थ्यासह द्वितीय आणि तृतीय वर्षात केलेल्या कामगिरीच्या आधारावर विविध विषयांत ९ सुवर्णपदके पटकाविली. तर याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी गुजराथी ही उत्कृष्ट विद्यार्थिनी ठरलीच. तिनेही दोन्ही वर्षांत एकूण सात सुवर्णपदके मिळविली. नाशिकच्या या विद्यार्थ्यांच्या नावाचा उद्घोष झाला तेव्हा सबंध सभागृहाने टाळ्यांच्या गजरात त्यांच्या यशाचे कौतुक केले.
गुणवंतांचा गौरवमान्यवरांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या ७४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली, तसेच संशोधन पूर्ण करणाºया २२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
या दीक्षांत समारंभासाठी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये घेतलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ८८८३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.पदवीदान सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवर आणि विद्वतजन मिरवणुकीने समारंभस्थळी उपस्थित झाले. यामध्ये कुलगुरू, प्रतिकुलगुरू, कुलसचिव सहभागी झाले होते.