छेडछाड रोखण्यासाठी तरुणींनी पुढे यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:32 AM2017-08-12T00:32:46+5:302017-08-12T00:33:08+5:30
महाविद्यालयात, शाळा परिसरात व रस्त्यांवर मुलींना व महिलांना छेडछाडीचा त्रास होत असेल तर त्वरित पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ही वासनांध रॅगिंग त्वरित रोखावी, असे मत येथील पे.द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील चर्चासत्रात व्यक्त क रण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : महाविद्यालयात, शाळा परिसरात व रस्त्यांवर मुलींना व महिलांना छेडछाडीचा त्रास होत असेल तर त्वरित पोलीस किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ही वासनांध रॅगिंग त्वरित रोखावी, असे मत येथील पे.द. सुराणा कनिष्ठ महाविद्यालयातील चर्चासत्रात व्यक्त क रण्यात आले. ‘विद्यार्थिनींसाठी महिलांचे कायदेविषयक अधिकार’ या विषयावर आयोजित या चर्चासत्रात मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना अॅड. रुपल चोरडिया यांनी महिलांचे कायदेशीर अधिकार या विषयी मार्गदर्शन केले. मुलींची जर कोणी छेड काढत असेल तर छेड काढणाºयाला न कळता पोलिसांना टवाळखोरांबाबत माहिती द्यावी. यात गुप्तता पाळण्याची विनंती केल्यास तक्रारदार समोर येत नाही, असे त्यांनी सांगितले. असे केल्यास मुली, महिलांना त्रास देणाºया अपराधीला रंगेहात पकडता येईल व त्याच्या कारवाई करणे सोपे जाईल. महिलांनी असे प्रकार मुळीच खपवून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, उपप्राचार्य प्रा. पी. व्ही. ठाकोर, कार्यक्रमाचे व्याख्याते व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींना कायदेविषयक ज्ञान, महिलांवर घरामध्ये होणारे अन्याय, स्त्री भू्रणहत्या, महविद्यालयात होणारी रॅगिंग, हुंडाविषयक समस्या, विवाहित स्त्रियांचे फारकतविषयक प्रश्न याबाबतचे कायदे, समाजातील विविध स्तरातील उदाहरणे देऊन अॅड. रुपल चोरडिया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्न व शंकांचे समाधान करण्यात आले. श्रीमती वा. पी. भाबड यांनी ही केले. सूत्रसंचालन केले. श्रीमती जे.व्ही.वाघचौरे यांनी आभार मानले.